केंद्रीय यंत्रणेकडून राज्य सरकारला वेठीला धरण्याचे काम होत आहे ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

प्रभाकर साईल यांना मुंबई पोलिसांकडून संरक्षण

जनता आणि शेतकरी यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारने क्षमा मागावी ! – सदाभाऊ खोत, आमदार, भाजप

वारेमाप आश्वासने आणि घोषणा यांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणार्‍या सरकारने जनता अन् शेतकरी यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.

माझे वडील हिंदु असून मी संमिश्र कुटुंबातील आहे ! – समीर वानखेडे, विभागीय संचालक, अमली पदार्थविरोधी पथक

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे. त्यामध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांच्या नाव ‘दाऊद’ असे लिहिले आहे.

राज्यशासनाच्या अध्यादेशात औरंगाबादसमवेत संभाजीनगरचाही उल्लेख केल्याने पुन्हा वाद निर्माण !

लक्षावधी हिंदूंची हत्या करून छत्रपती संभाजी महाराज यांनाही हालहाल करून मारणार्‍या औरंगजेबाचे नाव अजूनही शहराला देण्यात आले आहे, हे सर्व पक्षांतील लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे.

प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपावरून समीर वानखेडे यांची विभागीय चौकशी होणार !

अमली पदार्थविरोधी पथकाने ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर केलेल्या कारवाईतील पंच असलेले प्रभारक साईल यांनी आर्यन खान यांच्या सुटकेसाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.

समीर वानखेडे यांच्या याचिकेवरील सुनावणीस मुंबई सत्र न्यायालयाचा नकार !

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविषयी तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका केली होती.

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सोलापूर येथील ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम राबवला जाण्याची शक्यता !

२ दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची ‘झूम ॲप’द्वारे ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत सोलापूर जिल्हा परिषदेने राबवलेल्या ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाविषयी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ! – माधव भंडारी, भाजप

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र येथील सरकारांनी आस्थापनाला काळ्या सूचीत टाकले होते; मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आग्रहामुळे पुन्हा याच आस्थापनाला परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले.

कोंढव्यातील (जिल्हा पुणे) ‘साखळी’ पशूवधगृहावर धाड टाकून १४ गायी आणि ५ टन गोमांस जप्त !

प्रशासन गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी करणार ?

परभणी येथे लिंगायत महामोर्चाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी महामोर्चा !

या सभेत विविध वक्त्यांनी सरकारच्या उदासीनतेवर टीका केली. ‘गेल्या अनेक वर्षांपासून लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी लिंगायत बांधव देशाच्या विविध राज्यांत आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत १० मोर्चे काढण्यात आले.