साहाय्यक प्रादेशिक वाहन अधिकारी यांनी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी सव्याज ५० सहस्र रुपये आणि तक्रारीच्या खर्चाची रक्कम तक्रारदाराला देण्याचे आदेश !

वाहन विहित मुदतीत हस्तांतरण न केल्यामुळे हानीभरपाई म्हणून तक्रारदार भालचंद्र सोहनी यांना ५० सहस्र रुपये द्यावेत, असा आदेश ‘रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला.

नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच ! – आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे, सनातन संस्था

हिंदूंचे नववर्ष हे गुढीपाडव्यालाच चालू होते. त्यामागे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक कारणे आहेत. याउलट १ जानेवारीलाच नवीन वर्ष का ? याला कुठलाही आधार नाही.त्यामुळे नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच होय, असे प्रतिपादन त्यांनी केले.

संस्कृती जतन महत्त्वाचे !

अभिषेक हा संगणक अभियंता असून त्याची पत्नी राधा ही औषध आस्थापनात काम करते. दोघेही उच्चशिक्षित असून सांस्कृतिक परंपरा जपण्याचा दोघांचाही प्रयत्न स्तुत्य आहे.

निधन वार्ता

सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे साधक श्री. किशोर दिवेकर यांचे वडील हरिभाऊ दिवेकर (वय ६१ वर्षे) यांचे करोटी, पेण (जिल्हा रायगड) येथे २८ डिसेंबर या दिवशी १० वाजता अपघातामुळे निधन झाले.

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या चित्रपटाला वैध मार्गाने विरोध करा !

‘अतरंगी रे’ या हिंदी चित्रपटतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे.  या चित्रपटात हिंदु नायिकाचे कुटुंबीय मुसलमान नायकाला जिवंत जाळतात. यातून हिंदू ‘हिंसाचारी’, तर मुसलमान ‘पीडित’ दाखवण्यात आले आहेत.

आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर वीर हिंदु हुतात्मे आजच्या भारतीय नेत्यांचा धिक्कार करतील !

‘हे योग्य आहे की, आम्ही विध्वंसक आणि स्फोटक अमानवीय संस्कृतीचे वाहक नसून सृजनात्मक निर्मिती अन् रचनात्मक कार्यांची संस्कृती असणार्‍या समाजाचे अंग आहोत.

हिंदुत्वाऐवजी ‘भारतियत्व’आल्याने हिंदू अस्मिताशून्य, पुरुषार्थहीन आणि भ्याड होणे !

‘मोठ्यामोठ्यांना आज ‘हिंदु’ म्हणवून घेण्याची लाज वाटते; म्हणून आमचेच बांधव आमच्यावर उलटून पडतात; मग भारतीय म्हणून स्वतःला संबोधू लागतात. आता हिंदुत्वाऐवजी ‘भारतियत्व’ आले. हे आमचे पराकोटीचे मानसिक अधःपतन आहे.

३१ डिसेंबर साजरा करणे, हे वर्षभराचे धर्मांतर ! – सौ. रति हेगडे, स्तंभलेखिका

३१ डिसेंबरला होणारे धर्मांतर हे एक दिवसाचे नसून वर्षभराचे असते; कारण वर्षभर ‘ग्रेगेरियन’ दिनदर्शिका वापरली जाते. स्वतःची आधुनिकता दाखवण्यासाठी हिंदू मद्यपान, मांसाहार, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी गोष्टी सर्रासपणे करतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी घेतलेल्या शिबिरानंतर ज्ञानशक्ती प्रसार अभियानांतर्गत ‘मकरसंक्रांत’ मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘समष्टी सेवेची तीव्र तळमळ आणि साधकांना साधनेत पुढे नेण्याचा अखंड ध्यास असणार्‍या सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रसार कसा करायचा ?’, यासाठी ऑनलाईन शिबिर घेतले