कोरोनाच्‍या लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणार्‍या दोन धर्मांधांना कुर्ला येथून अटक !

कोणत्‍याही प्रकारच्‍या गुन्‍हेगारीत धर्मांधच पुढे असतात. अशा धर्मांधांना कठोरात कठोर शासन करणेच उचित ठरेल !

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण !

अनेक मंत्री त्‍यांच्‍या संपर्कात आल्‍याने अधिवेशाच्‍या शेवटच्‍या दिवशी चिंतेचे वातावरण निर्माण झाले. वर्षा गायकवाड यांनी ट्‍वीट करत त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍यांना  कोरोना चाचणी करून घेण्‍याचे आवाहन केले आहे.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय स्‍मारकाचे काम न्‍यायालयीन प्रक्रियेमुळे रखडले !

मुंबईलगत असलेल्‍या अरबी समुद्रात उभारण्‍यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय स्‍मारकाचे काम न्‍यायालयीन प्रक्रियेमुळे रखडले आहे. न्‍यायालयाने स्‍मारकाच्‍या बांधकामाला स्‍थगिती दिली आहे.

दत्तजयंतीनिमित्त केलेल्या प्रसारात धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

दत्तजयंतीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींच्या माध्यमातून ‘दत्तजयंतीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर ऑनलाईन प्रवचन घेण्यात आले. प्रवचनांच्या प्रसारसेवेत धर्मशिक्षणवर्गात नियमित येणारे भोर, नाशिक रस्ता आणि माळवाडी येथील धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी त्वरित आदेश देण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

‘ओमिक्रॉन’च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या प्रशासनाला सूचना

परदेशी नागरिकांची माहिती मिळवून ७ दिवसांनंतर पुन्हा त्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करावी. त्याचबरोबर विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे.

गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने घाईघाईने रात्रीची संचारबंदी लागू करता येणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची संख्या वाढत जात असल्यास कृती दलाची बैठक झाल्यानंतर ३ जानेवारी या दिवशी निर्बंध लावण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.

मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते कळंगुट जंक्शनवर पोर्तुगालचे फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या पुतळ्याचे अनावरण

देशप्रेमी नागरिकांच्या मते, ज्या पोर्तुगिजांनी गोव्यात ४५० वर्षे अत्याचारी राजवट केली, त्या राष्ट्राचा प्रतिनिधी असलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डो याचा पुतळा गोव्यात उभारणे, ही गोमंतकियांसाठी लज्जास्पद गोष्ट !

‘हिल टॉप’, वागातोर येथे चालू असलेल्या छोट्या स्वरूपातील ‘सनबर्न’मध्ये कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन

गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘समाजात, कार्यालयात आणि इतरत्र अहंकार, खोटे बोलणे, भ्रष्टाचार इत्यादी गोष्टींचे अनुकरण केले जाते, तर सनातनच्या आश्रमांत चांगल्या गुणांचे अनुकरण केले जाते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले