आर्यन खान याच्या सुटकेचे वृत्तसंकलन करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची आर्थर रोड कारागृहाबाहेर झुंबड

काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक ठरवणार्‍या वाहिन्या अमली पदार्थांशी संबंधित आरोप असलेल्या व्यक्तीच्या सुटकेची वृत्ते दिवसभर दाखवून टी.आर्.पी.साठी त्यांचे उदात्तीकरण करतात, हे लक्षात घ्या

तुळजापूर आणि शनिशिंगणापूर या देवस्थानांकडे सरकार ५ वर्षे फिरकलेच नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एकीकडे शासनाला स्वत:चे उद्योग धड चालवता येत नसल्यामुळे ते विकावे लागत आहेत. मग कोणत्या तोंडाने सरकार ‘आम्ही मंदिरांचे व्यवस्थापन करू’, असे म्हणते ?

धगधगते त्रिपुरा !

परिस्थितीचे अवलोकन न करता निवळ हिंदूंना झोडपणे हा ज्याचा-त्याचा स्वार्थ आहे, मग तो टी.आर्.पी.साठी असो वा मतांसाठी ! या स्वार्थी भूमिकेत हिंदू मात्र भरडले जात आहेत.

संभाजीनगर येथे भांडण सोडवण्यास गेलेल्या ‘दामिनी’ पथकावरच २ तरुणींचे आक्रमण !

शहरात कुठेही महिलांच्या साहाय्यासाठी धावून जाणार्‍या ‘दामिनी’ पथकाला भांडणार्‍या महिलांनी आक्रमण करून मारहाण केली ! स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

सातारा नगरपालिकेत १६ नगरसेवक वाढणार !

शहराची सीमावाढ आणि नगरपालिकांच्या किमान सदस्यसंख्येत १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे.

जाफराबाद (जिल्हा जालना) येथे राज्य परिवहन महामंडळाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार !

आंदोलनकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळ, तसेच सरकार यांच्या विरोधात घोषणा देऊन शिवीगाळ केली. यामुळे एस्.टी.च्या अधिकार्‍यांनी पोलिसांचे साहाय्य घेऊन आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला.

पालघर येथील लाचखोर पशूसंवर्धन अधिकारी कह्यात 

एका पशूवैद्यकीय अधिकार्‍यांचे स्थानांतर झाल्यावर त्यांना कार्यमुक्त आणि पदभारमुक्त करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वर्ग १ चे पशूसंवर्धन अधिकारी संजीत धामणकर (वय ४८ वर्षे) यांनी त्यांच्याजवळ २० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

भारत सरकारने या आस्थापनांवर बंदी घालावी !

‘मॅकडोनल्ड्स’, ‘बर्गर किंग’, ‘डॉमिनोज्’, ‘पिझ्झा हट’ ‘टॅको बेल‘, ‘चिपोटल’ आदी खाद्यपदार्थ विकणार्‍या आस्थापनांच्या खाद्यपदार्थांमध्ये रसायनांचा वापर केला जातो’, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका संशोधनातून समोर आला आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा सप्टेंबर २०२१ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

या मासात ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून १४ सहस्र १२६ जिज्ञासूंनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.