५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बदलापूर येथील कु. श्लोक राकेश परचुलकर (वय ५ वर्षे) !

देवाची पूजा करणे, घंटा वाजवणे आणि आरती करणे आवडते. दिव्यांची अमावास्या, श्री गणेशचतुर्थी, लक्ष्मीपूजन यांसारख्या सण-उत्सवात देवतांची मांडणी केल्यावर श्लोक मनोभावे नमस्कार करतो. त्याला औक्षण करून घ्यायला आवडते. श्लोकला परात्पर गुरुमाऊली यांच्या ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथातील चित्रे पहायला आवडतात.