‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडून वितरित करण्यात आलेले साडेसतरा सहस्र कोटी रुपयांचे कर्ज बुडीत !

एरव्ही कर्ज घेतलेल्या सामान्य खातेदारांनी हप्ते न फेडल्यास त्यांच्या मागे बँकांकडून तगादा लावला जातो. शेवटचा पर्याय म्हणून अशांची संपत्तीही जप्त केली जाते. याउलट ‘श्रीमंत’ थकबाकीदारांना नेहमीच ‘विशेष वागणूक’ दिली जाते !

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यास परमबीर यांना कुणी रोखले होते ? – मुंबई उच्च न्यायालय

बारमालकांकडून १०० कोटी रुपये जमा करण्याच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा नोंद करण्यास तत्कालीन पोलीस आयुक्तांना कुणी रोखले होते ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

(म्हणे) ‘संघातील अनेकांनी लग्न केले नाही, त्यांच्यासाठी एक  ‘पॉलिसी’ बनवा !’ – नवाब मलिक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेकांनी लग्न केलेले नाही, त्यांना मुले नाहीत. त्यांच्यासाठी एक ‘पॉलिसी’ (धोरण) बनवा, असे वादग्रस्त वक्तव्य अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणी अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार ! – सदाभाऊ खोत, नेते, रयत क्रांती संघटना

जरंडेश्वर साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर ऊस कुठे घालायचा ?, असा प्रश्न तेथील शेतकर्‍यांना पडला आहे. या कारखान्यावर प्रशासक नियुक्त करून शेतकर्‍यांची होणारी हानी थांबवावी, अशी मागणी माजी मंत्री आणि ‘रयत क्रांती संघटने’चे नेते सदाभाऊ खोत यांनी १३ जुलै या दिवशी केली आहे. 

अतीशहाणे !

आपल्या अतीशहाण्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा उदोउदो काही दिवस होऊन त्यांचा ‘ग्लॅमर’ इतिहासजमा होणार आहे, तर हिंदु राष्ट्र मात्र पुढील किमान १ सहस्र वर्षे टिकून जगाचे कल्याण करील, हे नासाच्या उदाहरणातून लक्षात घेऊन आपण ‘हिंदु’ भारतीय आश्वस्त होऊया !

रिक्त पदे लवकर भरा !

‘सरकारी क्षेत्रातील प्रलंबित निर्णय पूर्ण होण्यासाठी कुणाचा तरी बळी जाणेच अपेक्षित आहे का ?’ असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

शिवसेनेचे कार्य घरोघरी पोचवण्यात करवीरकरांची नेहमीच साथ ! – संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

शिवसेना संपर्क अभियानासही करवीरची जनता भरभरून प्रतिसाद देईल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केला. ‘शिवसेना संपर्क अभियान लक्ष्य २०२२’चा उंचगाव, गांधीनगर येथून प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’च्या कोकण विभागाच्या वतीने पत्रकारांना विविध साहित्यांचे वाटप

पत्रकार वृत्तसंकलन करत असतांना मोठी जोखीम पत्करून काम करत असतात. अशा वेळी त्यांना साहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागाच्या वतीने ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’, ‘रेनकोट’, ‘डायरी’, ‘पेन’, ‘शर्टपिस’ अशा विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.

केरळमधील साम्यवादी सरकारचे ख्रिस्तीप्रेम जाणा !

केरळ राज्यातील नन अभया हत्याकांडच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे पाद्री थॉमस आणि नन सेफी यांना ‘पॅरोल’वर सोडल्याच्या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने राज्यातील साम्यवादी आघाडी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हेच सर्वश्रेष्ठ शिक्षण ! – विकास दवे, संचालक, मध्यप्रदेश साहित्य अकादमी

सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हे सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे. त्यासाठी आध्यात्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करावी !