राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील २ निवासस्थानी ‘ईडी’ची पुन्हा धाड !

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या काटोल, तसेच वडविहिरा येथील २ निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) १८ जुलै या दिवशी सकाळी ८ वाजता धाड टाकली.

उद्योगाकडे समष्टी साधना म्हणून पाहिल्यास आनंद मिळण्यासह समस्यांचेही निराकरण होईल ! – रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी’ उद्योगसमूह

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘व्यवसाय, उद्योग आणि वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठी साधनेचे महत्त्व’ या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ परिसंवादात ते बोलत होते.

हिंदूंनो, स्वतःमधील शौर्य जागृत करा ! – शबरी देशमुख, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होत्या.

मुंबईतील काही ठिकाणांना यापूर्वीच देण्यात आले आहे क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव !

राजकारण आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या सूत्रावर शिवसेना अन् भाजप यांनी ठाम भूमिका घ्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे, मुंबईतील ज्या ठिकाणांना क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्यात आले आहे, ती नावे त्वरित पालटून आक्रमकांचे उदात्तीकरण रोखावे

वारकरी संप्रदाय, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने पुणे येथे आंदोलन !

पालखी सोहळ्यात वारकर्‍यांनी सहभागी होण्याविषयी राज्य सरकारने जाचक अटी घातल्या आहेत आणि ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

आषाढी वारीला अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदु परिषदेचे राज्यात १५४ ठिकाणी तीव्र भजनी आंदोलन !

आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी जाण्याची अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ १७ जुलै या दिवशी विश्व हिंदु परिषदेच्या वतीने राज्यात १५४ ठिकाणी तीव्र भजनी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वारकरी संप्रदायही सहभागी झाला होता.

पायी वारीला अनुमती न दिल्यास तीव्र सत्याग्रह करू !

सरकारने वारीला अनुमती दिली नाही, तर येत्या काळात वारकर्‍यांच्या वतीने व्यापक आणि उग्र स्वरूपाचा सत्याग्रह केला जाईल, अशी चेतावणी समस्त वारकरी समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली आहे.

कीर्तनकारांनी सर्वधर्मसमभाव शिकवण्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता आणि संत यांच्यावर टीका करू नये !

कीर्तनकारांनी भावनेच्या भरात सर्वधर्मसमभाव शिकवण्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता आणि संत यांच्याविषयी टीका करू नये, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांना यापुढे हिंदूंनी मतदान करू नये ! – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

असाच पुढाकार ते मुसलमान मुलीचा विवाह हिंदु मुलासमवेत करण्यासाठी घेणार का ? बच्चू कडू यांनी हिंदु धर्मविरोधी कार्य केले आहे. यामुळे यापुढे हिंदूंनी त्यांना मतदान करू नये, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी केले

‘टिपू (सैतान) ची बाग !’

सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा ही एक पद्धत बनून जाईल. उद्या तैमूर, अकबर, बाबर, मोगल या सर्वांचेच उदात्तीकरण केले जाईल आणि पुन्हा कुणी नवा टिपू जन्माला येईल.