महाराष्ट्रात ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांची संख्या ५ सहस्रच्या वर

नागपूर, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक येथे रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील ६७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट !

पाणीटंचाई उन्हाळ्यामुळे नव्हे, तर वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत्जनित्रांची व्यवस्था न करणे, प्रशासनाचा गलथानपणा आणि नियोजनाअभावी पाण्याचा काटकसरीने वापर न करता बेसुमार वापर केल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

‘बाळकडू’ चित्रपटाच्या महिला निर्मात्याला अटक !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आधुनिक वैद्या स्वप्ना पाटकर यांना फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईत पाणी भरणार नाही, असा दावा कधीच केला नव्हता !  किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस चालू यांमुळे पाणी भरणारच. पुणे येथेही पाणी तुंबले आहे. आताही काही भागांमध्ये पाणी साचलेले नाही. पाण्याचा निचरा झालेला आहे

लोक लसीकरणासाठी बाहेर पडण्याची वाट न पहाता घराघरांत जाऊन लसीकरण करायला हवे ! – मुंबई उच्च न्यायालय

आजच्या क्षणाला कोरोना हा आपल्या घरात घुसलेला शत्रू आहे. त्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला पाहिजे. लोक लसीकरणासाठी बाहेर कधी पडतील ? याची वाट न पहाता घराघरांत जाऊन लसीकरण करायला हवे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

धुळे येथे हिंदूंसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले १०० खाटांचे कोरोना अलगीकरण आणि विलगीकरण केंद्र !  

कोरोनाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धुळे जिल्ह्याच्या वतीने जनसेवार्थ १०० खाटांचे कोरोना विलगीकरण आणि अलगीकरण केंद्र गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर विनामूल्य चालू करण्यात आले.

ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे मुंबईत कामावरून घरी परतणार्‍या नागरिकांचा खोळंबा

घरी परतणार्‍या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दुपारी ३ वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वेस्थानकावर ताटकळत उभे रहावे लागले, तर रस्ते वाहतुकीने घरी जाणारे नागरिक वाहतूककोंडीमुळे ५-६ घंटे रस्त्यांवर अडकून पडले.

मुंबईतील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प, तर सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल !

पहिल्याच पावसामुळे मुंबईची झाली दूरवस्था ! रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वेस्थानकांवर कर्मचार्‍यांचा खोळंबा, शीव रेल्वेस्थानकाला तलावाचे स्वरूप !

विशाळगडावरील १२ जणांना अतिक्रमणे काढून घेण्याच्या पुरातत्व विभागाच्या नोटिसा !

गेली १७ वर्षे कोणतीच कृती न करणार्‍या पुरातत्व विभागाने किमान अतिक्रमणांच्या संदर्भात पहाणी करून नोटिसा देणे, ही समाधानाची गोष्ट आहे; मात्र विशाळगडावर वर्ष १९९८ पासून मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे पहाता गडावर ६४ मोठी आणि नव्याने बांधकाम झालेली ४५ छोटी अतिक्रमणे आहेत.

‘गूगल मॅप’वर नगर येथील ‘पॉटींजर रोड’चे नाव दाखवले जात आहे ‘औरंगजेब रोड !’

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही भारतातील अनेक भागांना इंग्रज आणि मोगल आक्रमकांची नावे असणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! सरकारने ही नावे तात्काळ पालटून त्यांना भारतीय नावे द्यायला हवीत, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !