कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्याच्या पूर्वसिद्धतेसाठी ‘कृती दला’ची बैठक

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट बालकांना लक्ष्य करू शकते.

७ जूनपासून महाराष्ट्रात पाच टप्प्यांत दळणवळण बंदी उठवण्याची अधिसूचना प्रसिद्ध !

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या प्रशासकीय पातळीवरील निर्बंधांची कार्यवाही करण्यात येईल.

गोव्यातील संचारबंदीत १४ जूनपर्यंत वाढ

गोव्यात ५ जून या दिवशी कोरोनाबाधित १७ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ४ सहस्र १३१ चाचण्या करण्यात आल्या.

समुपदेशनाच्या पुढे !

संपूर्ण देशभरातच घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे; पण गोवा राज्याने त्यासंदर्भात कृती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. आता समुपदेशन रहित झाले असले, तरी अन्य अनेक मार्गांनी विवाहसंस्था वाचवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात.

पुत्तूरू (कर्नाटक) येथे धर्मांधाकडून दुकानात घुसून तरुणीचा विनयभंग

अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात, पाय तोडण्याच्या किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याच्या शिक्षेची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक

सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त आज ‘ऑनलाईन’ व्याख्यान

जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त इतिहास संशोधक श्री. इंद्रजित सावंत यांचे ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावर रविवार, ६ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सरपंचांच्या चेतावणीनंतर प्रशासनाकडून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका सुपुर्द

खनिकर्म विभागाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ‘पासिंग’ करून न घेतल्याने गेले ५ ते ६ दिवस मुख्यालयात उभ्या करून ठेवल्या होत्या.

फेसबूकचा हिंदुद्वेष कायम !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक आणि ‘सनातन शॉप’ ही पाने बंद करण्यात आल्यानंतर समितीचे हिंदी पानही बंद करण्यात आले आहे, तसेच अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘फोरम फॉर हिंदू अवेकनिंग’चे पानही बंद करण्यात आले आहे.

‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व वृद्ध आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !

हल्लीचे आंग्लाळलेले तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ या पाश्चात्त्यांच्या आधुनिक संस्कृतीनुसार वृद्धाश्रमात पाठवतात. याचे पाप त्यांना जन्मोजन्मी भोगावेच लागणार आहे.