रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी भरून २२ सहस्र रुपयांना विक्री !

शिवाजीनगर पोलिसांनी २ आरोपींना अवैधरित्या रेमडेसिविर इंजेक्शन विकतांना पकडले होते. या आरोपींकडून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून हे बनावट इंजेक्शन २२ सहस्र रुपयांना विकले जात असे.

महाराष्ट्रात आणखी ५ दिवस मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता !

सध्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिणेकडील अन्य भागांत अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुढील पाच दिवसांत वादळी वारा आणि मेघगर्जना यांसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कल्याण येथे धर्मांधाकडून ४ लाखांहून अधिक किमतीचा गांजा हस्तगत !

महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून रहमत युसूफ पठाण या धर्मांधाला अटक केली आहे. त्याच्याकडून २७ किलोहून अधिक वजनाचा गांजा हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.

जलपर्णी काढण्यासाठी मनपा करत असलेली उपाययोजना तात्पुरती ! – पर्यावरणशास्त्रज्ञ सचिन पुणेकर यांची टीका

पुणे शहरातील जलपर्णी काढण्यासाठी मनपाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा व्यय

कोरोनाच्या काळात अशी कृती हा जनताद्रोहच !

६२ वर्षे असलेली निवृत्तीची वयोमर्यादा वाढवावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षक संघटनेने १ मेपासून संपावर जाण्याची चेतावणी दिली आहे. या संघटनेचे १ सहस्र २०० सदस्य आहेत.

हिंदु राष्ट्रविरांना श्रीविष्णूच्या धर्मध्वजाचे आवाहन !

१ मे या दिवशी असलेल्या महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने… राष्ट्र आणि महाराष्ट्र या संकल्पनेशी मी लहानपणापासून जोडला गेलो. माझा मोठा काका महाराष्ट्र मुक्तीसंग्रामात हुतात्मा झाला आणि आमचे पूर्ण घर महाराष्ट्राला जोडले गेले. त्यामुळे राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व याचे बाळकडू परात्पर गुरुदेवांनी लहानपणापासूनच देण्याचे नियोजन केले होते. जसे शिवराय महाराष्ट्राचे, हिंदवी स्वराज्याचे होतेच, तसेच ते संपूर्ण हिंदुस्थानाचेही आहेत. श्रीगुरूंनीच … Read more

महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा प्राचीन इतिहास अन् त्यांची थोरवी !

ही मराठीची जी माहिती आहे, ती आपल्या पुढच्या युवा पिढीला, लहान मुलांना लहानपणापासून जर शाळेमध्ये शिकवली, तर मग त्यांना मराठीविषयी आत्मियता राहील.

बैठकीत विनामास्क सहभागी झालेल्या थायलंडच्या पंतप्रधानांकडून दंड वसूल !

बँकॉकमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकॉकचे राज्यपाल असविन क्वानमुआंग यांनी पंतप्रधानांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अमेरिकेत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील ट्वीट करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी इस्रायलमध्येही मास्क न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.