हिंदु देवतांशी संबंधित सर्व नियमांना घटनात्मक संरक्षण ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

मंदिरांमध्ये अहिंदु आणि श्रद्धाहीन लोकांनी घुसखोरी केल्याच्या विरोधात भा.दं.वि. २९५ (अ) नुसार कोणताही हिंदु धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून तक्रार प्रविष्ट करू शकतो. 

हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याच्यावर जालना येथे गुन्हा नोंद !

पुणे येथे काही मासांपूर्वी झालेल्या ‘एल्गार परिषदे’त हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याने ‘हिंदु समाज पूर्णपणे सडलेला आहे’, असे जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या. आतातरी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! 

तौक्ते वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजपासून २ दिवसांचा कोकणदौरा !

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ मे असे २ दिवस कोकणचा दौरा करणार आहेत.

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधिकेला फुलांची सुंदर वेणी देणे’, हे ईश्‍वराचेच नियोजन असण्याच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती !

देवाने असे काही नियोजन केले की, त्यामुळे मला आध्यात्मिक लाभ झाला. मला त्या दिवशी दिवसभर हलके आणि उत्साही वाटत होते. ‘यासाठी देवाप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करायची ?’, हे मला कळत नाही.

संवित् सोमगिरीजी महाराज यांना देण्यात आली भू समाधी !

‘बिकानेरचे विवेकानंद’ या नावाने प्रसिद्ध असणारे स्वामी संवित् सोमगिरी महाराज यांना आश्रम परिसरात कोरोना नियमांचे पालन करत भू समाधी देण्यात आली. शिवबाडी मठाचे स्वामी विमर्शानंद महाराज यांनी ही माहिती दिली.

अशांना फाशीची शिक्षा हवी !

नांदेड येथील गोदावरी रुग्णालयाच्या प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्ण अंकलेश पवार यांच्या मृत्यूनंतर ३ दिवस त्यांच्या मृत्यूची वार्ता नातेवाइकांपासून लपवून ठेवली आणि उपचार चालू असल्याचे सांगत त्यांच्याकडून ९० सहस्र रुपये उकळले.

‘म्युकरमायकोसिस’मुळे सोलापूर जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे ७५ हून अधिक रुग्ण आढळले असून एका सप्ताहात ४ रुग्ण दगावले आहेत; मात्र जिल्हा प्रशासनाकडून या आजाराची माहिती लपवण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी राज्य सरकार गंभीर का नाही ?

दहावीच्या परीक्षा रहित करणे, हा शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भातील महत्त्वाचा विषय असतांना महाधिवक्ता सुनावणीला उपस्थित नव्हते. यावरून विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी राज्य सरकार गंभीर का नाही ? असा प्रश्‍न १९ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

घरी जाऊन कोरोनावरील लस देण्याची सिद्धता असेल, तर लसीकरणाला अनुमती देऊ !

लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोनावरील लस घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, अंथरूणाला खिळलेले रुग्णाईत यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येऊ शकत नाही. अशा व्यक्तींना घरी जाऊन लस द्यावी.