राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचा गोवा शासनाचा दावा; मात्र गोमेकॉतील रुग्ण ऑक्सिजनअभावी अत्यवस्थ !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिदिन पहाटे ३ वाजता ऑक्सिजनचा तीव्र तुटवडा भासत आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना रात्री मरणासन्न अवस्थेला सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे.

वातावरण शुद्धीसाठी सोलापूर येथे एकाच वेळी ९०९ कुटुंबांनी केले गायीच्या गोवर्‍यांचे ज्वलन 

राम सेवा समिती, राधारानी भजनी मंडळ, सोलापूर जिल्हा माहेश्‍वरी महिला संघटन, माहेश्‍वरी प्रगती मंडळ महिला शाखा यांच्या वतीने एकाच दिवशी एकाच वेळी ९०९ कुटुंबांनी देशी गायीच्या शेणाच्या गोवर्‍यांचे ज्वलन करण्याचा उपक्रम राबवला.

नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही !

समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्रशासनाचा आहे. त्यामुळे नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

असे सेंटर सर्वत्र हवेत !

बनासकांठा (गुजरात) येथील तेतोडा गावातील एका गोशाळेचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. येथील रुग्णांवर गायीचे दूध आणि गोमूत्र यांपासून बनवण्यात आलेल्या औषधांच्या साहाय्याने उपचार केले जात आहेत.

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महासभेत होणारा अत्याधुनिक पशूवधगृहाचा विषय स्थगित !

अवैध पशूवधगृहाला विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ७ येथील इदगाह रस्ता भागात अत्याधुनिक पशूवधगृह बीओटी तत्त्वावर चालू करण्याचे नियोजन आहे.

होय, आम्ही हिंदु राष्ट्र वेडे आहोत !

हिंदु युवकांनो, या मातेच्या पायाशी आता समर्पित होण्याची वेळ आली आहे. चला, मायभूचे पांग फेडण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे व्रत हाती घेऊया. आपल्या हिंदूंच्या सिंधु नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी चला नवनिर्माण करूया हिंदुस्थानाचे !

सनातनचे संत आणि सद्गुरु यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘हिंदु राष्ट्र संघटन प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित असणार्‍या विविध संतांकडून विविध प्रकारची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती. तेव्हा संतांची पुढील आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.

‘भाववृद्धी सत्संग आणि व्यष्टी साधनेचा आढावा या दोन्ही ठिकाणी भगवंताचे अस्तित्व कार्यरत असते’, याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

भाववृद्धी सत्संग आणि व्यष्टी साधनेचा आढावा या दोन्ही ठिकाणी सुगंध येणे अन् ‘भाववृद्धी सत्संग आणि व्यष्टी साधनेचा आढावा, म्हणजे देवतेचे तारक-मारक रूप आहे’, असे जाणवणे

जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेतील उच्चार सर्वत्र सारखे असणे

‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले