स्वतःचे आचरण आणि भाव यांमुळे इतरांमध्ये सकारात्मक पालट घडवू शकणारे पू. माधव साठे !

पू. माधव साठेकाका म्हणजे परिपूर्ण सेवा करणारे व्यक्तीमत्त्व होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सेवेची तळमळ दिसून आली. २३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला.

सद्यःस्थितीत ‘कोरोना विषाणू’मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करता येत नसल्यास धर्मशास्त्रानुसार करावयाचा ‘पालाशविधी’ !

‘देशात सर्वत्र ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या कुटुंबियांना मृतदेह दिला जात नाही. अशा प्रसंगी ‘अंत्यविधी कसे करावेत ?’, असा प्रश्‍न समाजात निर्माण झाला आहे. या प्रसंगीही धर्मशास्त्रानुसार ‘पालाशविधी’ करणे सयुक्तिक होईल.

संसर्गाच्या कालावधीत घ्यावयाचा आहार आणि आरोग्याची स्थिती लवकर पूर्वपदावर येण्यासाठीचे उपाय

सध्या सगळ्यांनाच कळून चुकले की, या ना त्या पद्धतीने संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे दिवस गेले. सध्या एकच तत्त्व सगळ्यांनी पाळले पाहिजे की, संसर्ग आपल्याला होऊ शकतो; पण आपले आरोग्य पूर्वस्थितीला येण्याची गती (रिकव्हरी रेट) उत्तम असली पाहिजे.

नागपूर येथे खासगी रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांकडून आगाऊ पैशांची वसुली ! – माजी महापौर संदीप जोशी यांचा आरोप

शहरातील खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट चालूच आहे. सरकारचा आदेश झुगारून बहुतांश खासगी रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांकडून आगाऊ स्वरूपात पैशाची वसुली करतात.

‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा देऊन राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा !

पत्रकार सातत्याने वृत्तांकनाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक आहे.

‘सकारात्मकता’ : मानसिक स्वास्थ्याचे मूळ !

इच्छाशक्ती आणि सकारात्मकता असेल, तर मनुष्य प्रत्येक कठीण परिस्थितीतून मार्ग काढतो. असा मनुष्य मग कोरोनासारख्या आपत्तीकडेही यात सकारात्मक काय करता येईल ? ते पहातो.

आयुर्वेदाच्या चिकित्सेमध्ये कोरोना महामारीवर उपचार करण्याचे सामर्थ्य ! – काशी हिंदु विश्‍वविद्यालय

आयुर्वेदाचे चिकित्साशास्त्र केवळ आयुष काढ्यापर्यंतच मर्यादित नसून त्यामध्ये सध्याच्या कोरोना महामारीवर उपचार करण्याचे सामर्थ्य आहे, अशी माहिती येथील काशी हिंदु विश्‍वविद्यालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

जिल्हा रुग्णालयात ‘प्लाझ्मा’ देण्यासाठीचे यंत्र उपलब्ध करून द्यावे ! –  देव्या सूर्याजी, अध्यक्ष, युवा रक्तदाता संघटना

कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना प्लाझ्मा मिळवणे म्हणजे मोठे अग्नीदिव्य असून प्लाझ्मा देण्यासाठी कोरोनाच्या संसर्गातून बरी झालेली आणि त्याच रक्तगटाची व्यक्ती शोधतांना रुग्णांच्या नातेवाइकांचे अक्षरशः हाल होत आहेत. त्यात त्या व्यक्तीला कोरोनातून बरे होऊन २८ दिवस होणे आवश्यक आहे

देहली येथून ‘रेमडेसिविर’ आणल्याचे सांगण्याचा दिखाऊपणा टाळायला पाहिजे होता !

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने खासदार सुजय विखे पाटील यांना फटकारले.