बेंगळुरू येथे स्मशानभूमी बाहेर ‘हाऊस फुल’चा फलक !

‘भारतात अशी स्थितीही येईल’, असे कुणाला वाटले नव्हते; मात्र आपत्काळ येणार आहे, असे द्रष्टे, संत आदी सांगत होते, तेच अशा घटनांतून दिसत आहे !

चीनकडून भारतातील कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न !

एकीकडे चीन भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी साहाय्य करणार असल्याचे सांगतो, तर दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंविषयी खिल्ली उडवतो, हे लक्षात घ्या !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची होत आहे परवड !

कोरोनाकाळात ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर हा मानवतेसाठी कलंक !  – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज, श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रम, इंदूर

‘चर्चा हिंदु राष्ट्राची ! या विशेष परिसंवादांतर्गत ‘कोरोना संसर्गाच्या काळातही लाखो हिंदूंचे धर्मांतर : का आणि कसे ?’ या विषयावर चर्चासत्र

कोरोनाबाधितांना विनामूल्य रिक्शा सुविधा पुरवण्यासाठी मुंबईतील शिक्षक दत्तात्रय सावंत यांचा पुढाकार !

ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दत्तात्रय सावंत यांचा सत्कार केला. ‘कोरोनाचे संकट संपेपर्यंत जनसेवेचे हे कार्य चालू ठेवणार आहे’, असे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.

… तर १ जूनपर्यंत मुंबईतील कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा दर आटोक्यात येऊ शकेल ! – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च

मुंबईमध्ये ७५ टक्के लसीकरण झाले, तर १ जूनपर्यंत कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा दर आटोक्यात येण्याची शक्यता आहे, असा अभ्यास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी नोंदवला आहे.

कायद्याची कार्यवाही हवी !

ज्या भारतभूमध्ये गोमातेला देवतेचे स्थान आहे, त्या ठिकाणी तिच्यावरून पोलिसांचे प्राण कंठाशी येत आहेत, हे दुर्दैवी आहे. कायद्याची कडक कार्यवाही करणे पोलीस प्रशासनाच्या हातात आहे. त्यांचे कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावल्यास गोमाफियांच्या उद्दामपणावर चाप बसेल आणि गोमातांसह …

गोव्यात अनेक पंचायत आणि पालिका यांच्याकडून स्वयंस्फूर्तीने दळणवळण बंदी घोषित

वास्तविक राज्यशासनाने १० मे या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध लादले आहेत; हे निर्बंध दळणवळण बंदीसारखेच असूनही याला दळणवळण बंदी, असे संबोधले नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट किट’ संपली

सरसकट सर्वांची तपासणी करण्यात येत असल्याने किटचा तुटवडा

नागपूर येथे कोरोनाच्या ३५ नमुन्यांत ५ नवीन ‘स्ट्रेन’ आढळले !

शहरात कोरोनाचे ५ नवीन ‘स्ट्रेन’ सापडले आहेत. देहली येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३५ नमुन्यांमध्ये हे नवीन ‘स्ट्रेन’ आढळून आले आहेत. सर्दी, खोकला, ताप आणि अतिसार अशी या नव्या ‘स्ट्रेन’ची प्रमुख लक्षणे आहेत.