कोरोनाचा कहर

जेव्हा स्थुलातील प्रयत्न न्यून पडतात, तेव्हा सूक्ष्मातील प्रयत्न करावे लागतात. विविध संप्रदायांनी त्यांच्या उपासकांना देवाची भक्ती करण्यास सांगितले. औषधांसमवेत प्रार्थना आणि नामजप आदी उपाय केल्याने कोरोनापासून त्यांचे रक्षण झाले. याची नोंदही प्रशासनाने घेण्याची आज वेळ आली आहे !

कोरोनामुळे आठवडाभरात २६६ जणांचा मृत्यू, तर दिवसाला रुग्ण संख्या ९ सहस्रोंच्या वर

कोरोनामुळे मुंबईची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. ६ ते १२ एप्रिल या आठवडाभरात मुंबईमध्ये कोरोनाचे ६६ सहस्र ७७५ रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देहलीच्या सीमेवरील आंदोलक शेतकरी फिरत आहेत माघारी !

देहलीच्या सीमेवर गेल्या ४ मासांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आता येथून निघून जात आहेत. देहलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आंदोलक शेतकरी पलायन करत असल्याचे म्हटले जात आहे.

यवतमाळ येथे खाटांअभावी रुग्ण बाहेरच खोळंबून !

येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांनी पूर्णतः भरलेले आहे. त्यामुळे आता तेथे खाटाच शिल्लक नाहीत. रुग्णांना चिकित्सालयाच्या बाहेरच झोपून रहावे लागत आहे. ऑक्सिजनची आवश्यकता असणारे रुग्णही बाहेर बाकड्यावर बसून असतात.

प्रशासनाचे लक्ष केवळ लस-ऑक्सिजनवर, संसर्ग रोखण्यावर नाही ! – डॉ. सविश ढगे, माजी उपसंचालक, लष्करी आरोग्य सेवा

शहरात कोरोनाचे प्रमाण वाढण्याचे कारण ‘विदर्भ स्ट्रेन’ आहे. यामुळे संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांतही कोरोनाचे नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासमवेतच मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे.

तुमच्या कार्यामुळे सनातन धर्म बळकट होत आहे ! –  आमदार आणि महामंडलेश्‍वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर, हरिद्वार

ज्वालापूर विधानसभा (हरिद्वार) येथील भाजप आमदार आणि महामंडलेश्‍वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर यांची सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला भेट

हिंदूंनो, सावधान ! इतिहास पालटला जात आहे !

हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्‍या महाराष्ट्रातील हिंदु मावळ्यांचा इतिहास झाकोळून त्याला खोट्या धर्मांधतेची काजळी लावण्याचे धाडस या महाराष्ट्राच्या भूमीत केले जात आहे. हिंदूंनो, चला तर मग सत्य इतिहास समाजापर्यंत पोचवूया !

कोरोनामुळे १५ ते १७ एप्रिल या कालावधीत कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कनिष्ठ न्यायालये, औद्योगिक न्यायालये, उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करणारे लवाद इत्यादींचे कामकाज १५ ते १७ एप्रिल या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !

सनातनच्या आश्रमात १३ एप्रिल २०२१ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले.

भक्तवत्सल आणि भक्तांना सगुण साकार देवाचे दर्शन देणारे श्री स्वामी समर्थ !

१४ एप्रिल २०२१ या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन आहे. यानिमित्ताने…