कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळू मामा यांचा भंडारा उत्सव रहित !

कोरोनाचा संसर्ग असल्याने यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील बाळू मामा यांचा भंडारा उत्सव रहित करण्यात आला आहे. देवालय समिती, ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावरील गुन्ह्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाकडून पुण्याच्या पोलीस अधीक्षकांना समन्स !

फडणवीसांच्या वक्तव्याचा आधार घेत पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणावरून अधिवक्ता आदित्य मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती. यावरून महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने पुणे पोलीस अधीक्षकांना समन्स बजावले आहेत.

इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांचे शासकीय अनुदान रहित करा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू !

‘भाभासुमं’ने म्हापसा येथील गांधी चौकात केलेल्या धरणे आंदोलनात ही चेतावणी देण्यात आली.

गोवा मुक्तीलढ्यात भारतीय सेनेने वापरलेल्या रणगाड्यांची बेळगाव येथे दयनीय स्थिती

गोवा राज्य गोवा मुक्तीचे ६० वे वर्ष साजरे करत आहे, तरीही पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीपासून गोवा मुक्त करण्यासाठी भारतीय सेनेने वापरलेले रणगाडे बेळगावी येथे अजूनही दयनीय स्थितीत पडून आहेत.

पडेल येथील कोवीड कक्षात रुग्णांना चांगली वागणूक मिळत नसल्याचा भाजपचा आरोप

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना तालुक्यातील पडेल येथील कोवीड कक्षात चांगली वागणूक मिळत नाही. पडेल आरोग्यकेंद्रात कोवीड लसीकरणाचा वेगही अत्यंत अल्प आहे.

विजापूर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक हुतात्मा : ३ नक्षलवादी ठार

गेल्या ६ दशकांत नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करू न शकलेला भारत !

साटेली, भेडशी येथे तिलारी नदीच्या पात्रातील गाळ न काढल्यास नदीच्या पात्रातच उपोषण करण्याची चेतावणी

तालुक्यातील तिलारी धरण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठा पाऊस पडल्यावर साटेली, भेडशी येथील नदीला मोठा पूर येतो, तेव्हा कालव्यांचे दरवाजे उघडले जातात आणि पाण्याचा लोंढा येऊन पूरस्थिती निर्माण होते.

भ्रमणभाषवर ओटीपी क्रमांक विचारून युवकाची दीड लाख रुपयांची फसवणूक

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या युवकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी पोलिसांनी सायबर कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

आडवाटांवरचा प्रवास

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्यातील रस्ते उभारणीच्या कामाचे प्रत्यक्ष अवलोकन करण्यासाठी जंगलातून आणि चिखलातून १५७ किमी. प्रवास केला आहे.आतापर्यंतच्या इतिहासात अशा प्रकारे स्वतःच्या कपड्यांची इस्त्री मोडून जनतेला भेटण्यासाठी कोणत्याही मुख्यमंत्र्याने प्रयत्न केले नसतील.

दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी विशेष शासकीय अधिवक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा !

देवेंद्र फडणवीस यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी