गोव्यातही लव्ह जिहाद

केरळ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यांमधून लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर आली. त्यानंतर हिंदु मुलींच्या सुरक्षेसाठी उत्तरप्रदेशसह काही राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात कडक कायदे केले. लव्ह जिहादचे असे प्रकार आता शांतताप्रिय गोव्यातही समोर येऊ लागले आहेत.

पुणे परिसर भूकंपप्रवण क्षेत्राच्या ‘झोन ३’ म्हणजे सर्वसाधारण धोका असलेल्या क्षेत्रात येतो ! – डॉ. हेमंत आठवले

कोयनेच्या भूकंपप्रवण क्षेत्राबाहेर पुण्यासारख्या महानगराच्या जवळपास केंद्र असलेले भूकंप हे अल्प तीव्रतेचे असले, तरी या घटनांचा भूशास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला जवेली खुर्द येथे ५७ वर्षानंतर प्रथमच निवडणूक पार पडली !

नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी सरकार कधी पावले उचलणार ?

वणीच्या आरोग्य विभागात अत्यल्प कर्मचारी

प्रशासनातील रिक्त जागा भरण्यात काय अडचण आहे, ते जनतेसमोर आले पाहिजे. आरोग्य केंद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नसणे म्हणजे जनतेच्या जिवाशीच खेळण्यासारखे नाही का ?

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड, बंगाल आणि आसाम राज्यांमध्ये प्रबोधन अन् प्रशासनाला निवेदन

येथील बीएस्एस् महिला उच्च विद्यालयामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या कु. कनक भारद्वाज यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर प्रबोधन केले.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील यांच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि नगरसेवक नील सोमय्या यांच्यावर वास्तूविशारदाकडून (‘बिल्डर’कडून) खंडणी उकळल्याचा आरोप आहे. अद्याप या प्रकरणी त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग चालू करावेत ! – पू. भिडेगुरुजी

मराठी तरुणांनी हा आदर्श जोपासत नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग चालू करावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये प्रशासनाला निवेदन देणे, विद्यार्थ्यांचे प्रबोधन आणि ध्वजसंकलन अभियान

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २६ जानेवारीच्या निमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ अनेक वर्षांपासून राबवण्यात येत आहे. या अंतर्गत उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिशिंगणापुरच्या मंदिरात केली ग्रहशांती

अंधश्रद्धाविरोधी कायदा होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही प्रयत्न करत होती. त्यांच्या मंत्र्याने केलेली ग्रहशांती पक्षाला चालते का ?