परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञता असलेले एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ आठवले यांची एका साधकास अनुभवास आलेली सर्वशक्तीमानता आणि सर्वज्ञता क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत, आज अंतिम भाग पाहूया . . .

गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !

वर्ष २०१७ मध्ये मी विविध व्याधींनी रुग्णाईत असतांना मला आलेल्या अनुभूती आज मी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच लिहू शकत आहे.

स्वभावदोष माझा ‘अपेक्षा करणे’ ।

त्यावर उपाय एक, तो म्हणजे स्वयंसूचना देणे फार ।
प्रत्येक प्रसंगी ‘परेच्छेने वागणे’ हाच करा निर्धार ॥
वाढवा लवकर प्रेमभाव अन् करा दुसर्‍यांचा विचार ।
होईल सत्वरी गुरुकृपा अन् होई दूर हा विकार ॥

सध्याच्या शाळांमध्ये बाराखडीमधील अक्षरे शिकवण्याची आणि ओळखण्याची एक निराळी गंमतीशीर पद्धत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

‘‘आम्हाला शाळेत ‘न’ शब्द नळाचा आणि ‘ण’ शब्द म्हणजे बाणाचा’, असे शिकवले आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमच्या वेळी शाळेत असे काही शिकवले नव्हते. बाराखडीतील अक्षरांचा उच्चारानुसार ‘न’ आणि ‘ण’ हे लक्षात येणे महत्त्वाचे आहे.’’

सनातन निर्मित सत्संगांच्या ‘लिंक’ समाजातील व्यक्तींना पाठवण्याची सेवा करतांना ‘देव भरभरून देत आहे’, याची प्रचीती घेणारे पंढरपूर येथील श्री. अप्पासाहेब सांगोलकर !

‘आपण केवळ झोळी पसरायला हवी. देव भरभरून देत आहे. हे केवळ भगवंतच घडवू शकतो’, याची देव पावलोपावली जाणीव करून देत असतो याची जाणीव होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

‘मला साधकांमध्ये असलेली नम्रता आणि क्रियाशीलता हे गुण आवडले. मला आश्रमात राहून अजून शिकायचे आहे. त्यामुळे मला आश्रम सोडून जावेसे वाटत नाही.