लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक केलेले अधिकारी सुरेश रेड्डी यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

बक्षीस पत्राचा सिटी सर्व्हेचा उतारा देण्यासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी नगरभूपान अधिकारी सुरेश रेड्डी यांना २५ जानेवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित !

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत यांना त्यांच्या विशेष कामगिरीविषयी राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे. राज्यातील एकूण ४० जणांना हे पदक घोषित झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील सावंत हे एकमेव आहेत.

इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांच्या मागणीनुसार कमानवेस येथे महापालिकेच्या गाड्या लावण्यासाठी वाहतनळ 

महापालिकेने या कचरा गाड्यांसाठी कमानवेस येथे वाहनतळ उभारण्याचे काम चालू केले आहे. त्वरित काम चालू केल्याविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांनी आयुक्तांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे.

सिक्कीम सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी चोपले !

चीनच्या वाढत्या कुरापती पहाता चीनविरोधात भारताने थेट सैनिकी कारवाई करून अक्साई चीन आणि लडाख पुन्हा स्वतंत्र केला पाहिजे ! भारतीय सैन्याचे मनोबळही उंचावलेले असल्याने चीनला ते नक्कीच भारी पडतील, यात भारतियांना शंका नाही !

जगातील ५८ सहस्र ७०० मोठ्या धरणांपैकी बहुतेक धरणांचे आयुष्य संपत अल्याने जगाला धोका ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांच्या कॅनडामधील ‘जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थे’च्या ‘कालबाह्य होत असलेले जलसाठे : नवा धोका’ या अहवालानुसार यातील अनेक धरणांचे आयुष्यमान कधीच संपले आहे किंवा आगामी काही काळात संपणार आहे.

शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

देहलीमध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. शेतकर्‍यांचे आंदोलन हिंसक नाही, असे म्हणणार्‍यांना चपराक !

केरळच्या बिशपकडून सत्ताधारी माकपकडे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत एका ख्रिस्ती उद्योगपतीला तिकीट देण्याची शिफारस !

अशी शिफारस हिंदूंच्या एखाद्या संतांनी केली असती, तर तथाकथित निधर्मीवादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी एकच हल-कल्लोळ केला असता !

(म्हणे) ‘शेतकरी उठला तर तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय रहाणार नाही !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शेतकरी आंदोलनातील भाषणांचा गोशवारा पहाता हा मोर्चा शेतकर्‍यांच्या हितासाठी होता कि केंद्र सरकार पाडण्यासाठी होता ?, आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांपैकी किती जण शेतकरी आणि किती जण साम्यवादी आहेत, याचाही शोध घ्यावा लागेल !