राज्यातील अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे लाक्षणिक उपोषण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे, तसेच सातवा वेतन आयोग लागू करणे या मुख्य मागण्यांसाठी ११ जानेवारी या दिवशी सकाळपासून राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत.

गोव्याला कोरोना लसीचे २३ सहस्र ५०० ‘शॉट्स’ मिळाले ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा राज्याला १३ जानेवारी या दिवशी सकाळी कोरोना लसीचे २ सहस्र ३५० ‘वायल’चे प्रत्येक १० ‘डोस’ म्हणजेच २३ सहस्र ५०० ‘शॉट्स’ मिळाले आहेत. संबंधित यंत्रणेकडून लस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सोलापूर येथे नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्‍वर यात्रेस प्रारंभ

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या यात्रेस १२ जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहात तैलाभिषेकाने प्रारंभ करण्यात आला. प्रशासनाच्या आदेशानुसार मोजक्याच मानकर्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट

अभिनेता सोनू सूद यांच्यावर येथील महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्यातच १३ जानेवारी या दिवशी सोनू सूद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सकाळी भेट घेतली. या वेळी सूद यांनी पवार यांच्याशी चर्चा केली.

पंढरपूर येथील वाळू चोरी प्रकरणातील ३६ गाढवांची उटी येथे रवानगी

वाळू चोर वाळूची चोरी करण्यासाठी गाढवांचा वापर करतात.

स्वातंत्र्यवीर सावरकर शाळेतील शैक्षणिक आरक्षण कायम ठेवावे !

शैक्षणिक आरक्षण उठल्यास सदर जागी उपहारगृह, निवासी उपहारगृह, मद्यालय, व्यावसायिक बांधकाम होण्याची शक्यता आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासासाठी निधी अर्पण करण्याचे विश्‍व हिंदू परिषदेचे आवाहन

अधिकाधिक लोकांनी मंदिर उभारणीसाठी अर्पण करावे -विश्‍व हिंदू परिषद

राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन !

शहरात विविध संघटनांच्या वतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.

संमत निधीची कामे महापालिकेची आचारसंहिता लागण्यापूर्वी संपवा ! – राजेश क्षीरसगार, शिवसेना

अधिकारी नियम मोडून काम करत असत असतील, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू ! – आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे