मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामांतर ‘नाना शंकरशेठ’ असे करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर संमत करावा ! – खासदार अरविंद सावंत, शिवसेना

मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी फार जुनी आहे.

वणी पोलिसांकडून गोवंश तस्करी करणारी ५ वाहने जप्त आणि ८ जणांना अटक

वणीमार्गे तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी पुष्कळ प्रमाणात वाढलेली आहे. याविषयी गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाल्यावरून बायपास मार्गावर सापळा लावून ५ वाहनात कोंबून भरलेला २९ नग गोवंश सोडवला.

पतीइतकेच गृहिणींचेही काम महत्त्वाचे असल्याने त्यांनाही वेतन मिळायला हवे ! –  सर्वोच्च न्यायालय

घरी काम करणार्‍या गृहिणींचे कामही हे त्यांच्या नोकरी करणार्‍या पतीच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सोशल मीडिया प्रगत प्रशिक्षण शिबीर’ पार पडले 

जगभरामध्ये हिंदु धर्माची होत असलेली हानी थांबवण्यासाठी, तसेच धर्म, संस्कृती, हिंदु राष्ट्र यांच्या विचारांंच्या प्रसारासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ जानेवारी या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सोशल मीडिया प्रगत प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

इंदूर (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री हनुमानाचे विडंबन थांबले  

येथे एस्.आर्.जे. नावाचे एक खासगी आस्थापन आहे. हे आस्थापन मीठाच्या पाकिटावर श्री हनुमानाचे चित्र छापत होते.

विविध विषप्रयोगांद्वारे ३ वेळा ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा इस्रोच्या संशोधकाचा दावा

अंतराळ संशोधनात भारत स्वावलंबी होऊन प्रगती करत आहे, हे अनेक देशांना पहावत नसल्याने ते असे कृत्य करत असतील, याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारने संशोधकांच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक !

पृथ्वीच्या जवळ येणार आहे लघुग्रह ! – संशोधकांची माहिती

१५ व्या शतकात होऊन गेलेला फ्रान्सचा प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्त्रेडॅमस् याने वर्ष २०२१ मध्ये पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची भविष्यवाणी वर्तवली आहे. अशी घटना होण्याची शक्यता असल्याची माहिती अंतराळ संशोधकांनी दिली आहे.

आजचा दिनविशेष : आज मराठी पत्रकारदिन

६ जानेवारी १८३२ या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र चालू केले; म्हणूनच आचार्य जांभेकर यांना ‘मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक’ म्हटले जाते. आचार्य जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

केंद्र सरकारच्या प्राधिकरणाने सरकारी नियमावलीतून ‘हलाल’ शब्द हटवला !

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! केंद्र सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने हिंदूंच्या विरोधाची वाट न पहाता हिंदुविरोधी नियम, कायदे हटवावेत, तसेच हिंदूंच्या देवता, धर्म, समाज यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !