शेवगाव (जिल्हा नगर) येथे दत्त जयंती उत्साहात साजरा

सायंकाळी मंगलमय वातावरणात दत्तगुरूंच्या जन्मोत्सवाची पाळण्याची दोरी ओढण्यात आली.

खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ! – मेहबूब शेख, संभाजीनगर प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

एक युवतीने केलेल्या तक्रारीवरून मेहबूब शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत शेख यांनी त्यांची भूमिका मांडली.

२६ जानेवारीपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्ग, वांद्रे-वरळी सेतूसाठी ‘फास्ट टॅग’ बंधनकारक

पुढील दोन मासांत ‘फास्ट टॅग’चा वापर बंधनकारक केला जाईल

३० जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद घेण्याची बी.जी. कोळसे-पाटील यांची घोषणा

पूर्वानुभव पहाता या प्रकरणी गंभीर राहून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या कोळसे-पाटील यांच्यावर पोलीस कारवाई करणार का ?

सांगली येथील मोकळ्या भूखंडावरील शैक्षणिक आरक्षण उठविण्याचे राज्यशासन आणि महापालिका प्रशासन यांचे कारस्थान ! – विजय नामजोशी

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान या संस्थेस सलग १३ वर्षे मालकी हक्क आणि ताबा असलेली विश्रामबाग येथील भूमी माध्यमिक शाळा म्हणून आरक्षित आहे.

कोल्हापूर येथे इंग्लंड अथवा परदेशातून आलेला एकही प्रवासी अद्याप कोरोनाबाधित नाही

कोल्हापूर येथे इंग्लंडहून आलेल्या एकूण ६२ व्यक्तींची जिल्हा आरोग्य यंत्रणेने पडताळणी केली आहे. यांपैकी ५९ व्यक्तींच्या कोरोना चाचणी अहवालात ते सर्व कोरोनाबाधित नाहीत, असे आढळले आहे.

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मुखदर्शनास आजपासून प्रारंभ!

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे मुखदर्शन उद्या, १ जानेवारीपासून  पासून भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी मंदिराचे महाद्वार उघडण्यात येणार आहे. मंदिरात सध्या सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.

सोलापूर येथे नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन करणारा फलक !

शास्त्रीनगर भागातील धर्मप्रेमी युवकांनी पाश्‍चात्त्य परंपरा मोडीत काढून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा निर्धार केला. त्यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्याने, प्रशासनाला निवेदन देणे आदी माध्यमांतून ३१ डिसेंबरच्या विरोधात चळवळ

नववर्ष १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला साजरे करण्याच्या संदर्भात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांत हिंदु जनजागृती समितीद्वारे ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन !

उद्रेक होण्यापूर्वी…!

‘अ‍ॅमेझॉन’ हे एक बहुराष्ट्रीय आस्थापन आहे. अनेक देशांत त्याच्या शाखा आहेत; परंतु कुठल्या इस्लामी किंवा ख्रिस्ती राष्ट्रात अ‍ॅमेझॉनने त्यांच्या धर्मभावना दुखावल्याचे एकही उदाहरण नाही, हे १०० कोटी हिंदूंनी विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या की ते आपोआप वठणीवर येतील. त्यांना हीच भाषा समजते !