‘अपेक्षा करणे’ हा अहंचा पैलू घालवण्यासाठी साधिकेने केलेले चिंतन आणि तो न्यून करण्यासाठी केलेले प्रयत्न !

जेव्हा मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी समजले, तेव्हा ‘मला इतरांकडून पुष्कळ अपेक्षा असतात’, हे माझ्या लक्षात आले आणि मी प्रयत्न करण्यास आरंभ केला.

…ही आग अशीच धगधगत राहणार का ?

३ फेब्रुवारी या दिवशी हिंगणघाट येथील शिक्षिकेला सकाळी ७.३० च्या सुमारास पेेट्रोल टाकून जाळण्यात आलेे. ४० टक्के भाजलेल्या पीडित शिक्षिकेनेे मृत्यूशी झुंज देत १० फेब्रुवारी या दिवशी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी अखेरचा श्‍वास घेतला.

… तर भारतात आर्थिक अराजक माजेल ! – डॉ. अच्युत गोडबोले, अर्थव्यवस्थेचे अभ्यासक

फसलेली नोटाबंदी, त्यातून पसरलेली आर्थिक मंदी आणि त्यामध्ये उद्ध्वस्त झालेला व्यापार, उद्योग आणि सर्वसामान्य माणूस या सर्वांचा दोष एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच देता येणार नाही. खरा दोष आहे तो आपल्या देशाने स्वीकारलेल्या विकासनीतीचा.

‘आध्यात्मिक ऊर्जा टिकवण्यासाठी नामजप करायला पाहिजे’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे अन् त्याप्रमाणे केल्यावर ‘आध्यात्मिक ऊर्जा मिळत आहे’, असे वाटून पुढील सेवा चांगली करता येणे

‘सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी) एका साधिकेला विचारले, ‘‘तू थकलीस का ?’’ तेव्हा तिने ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यावर सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘आपण कधीच थकत नसतो. आपल्यात असलेली आध्यात्मिक ऊर्जा संपते; म्हणून आपण थकतो.

…तर अशा चित्रपटांवर बहिष्कार हा उत्तम पर्याय !

काही दिवसांपूर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापिठात (जेएन्यू) झालेल्या हिंसक आक्रमणानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण या आंदोलकांच्या भेटीसाठी जेएन्यूमध्ये गेल्या होत्या.

‘आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही भारताची बलस्थाने असल्याने त्यांच्या मुळावरच घाव घातल्यास त्याला दास बनवू शकू’, असा कावेबाज हेतू ठेवून भारतीय शिक्षणपद्धत आणि संस्कृती नष्ट करण्याचे कुटील कारस्थान रचणारा मेकॉले !

र भारताला दास (गुलाम) बनवायचे असेल, तर या देशाचा मेरुदंड, अर्थात भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा तोडाव्या लागतील; म्हणून माझे मत असे आहे की, आपल्याला यांची शिक्षणपद्धत आणि संस्कृती नष्टभ्रष्ट करावी लागेल.

 असा झाला श्री भवानीदेवीच्या आगमनाचा अविस्मरणीय सोहळा !

‘श्री भवानीदेवीचे शुभागमन होणार’, या आनंदात आश्रमातील साधक-साधिकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ देणारी श्री भवानीदेवी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ देण्यासाठी आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी प्रत्यक्ष आश्रमात येत आहे’, असा साधकांचा भाव होता.

रथसप्तमी

सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते.