महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

महाविकास आघाडीचे शासन विसर्जित (बरखास्त) करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

‘इलेक्ट्रॉनिक’ प्रसारमाध्यमांच्या नियमनासाठी अद्याप कायदा का नाही ? याविषयी गांभीर्याने विचार करावा ! – मुंबई उच्च न्यायालय

वर्तमानपत्रांच्या योग्य नियमनासाठी वर्ष १९७८ पासून ‘प्रेस कौन्सिल अ‍ॅक्ट’ असेल, तर वृत्तवाहिन्यांच्या नियमनाविषयी असा काही कायदा का नाही ? त्यांना मुक्त स्वातंत्र्य का देण्यात आलेले आहे ?

(म्हणे) ‘सरकारी पैशांतून मदरसा नाही, तर कुंभमेळाही नको !’ – काँग्रेस नेते उदित राज

इतकी वर्षे काँग्रेसकडून हज यात्रेला सहस्रो कोटी रुपयांचे अनुदान दिले गेले, त्यावर उदित राज तोंड का उघडत नाहीत ? त्यांनी मदरशांची तुलना कुंभमेळ्याशी करून स्वतःची हिंदुद्रोही मानसिकता दाखवून दिली आहे !

मदरशांमध्ये आतंकवाद्यांचा पैसा असल्याने सर्व मदरसे बंद करा !

मदरशांमध्ये आतंकवाद्यांचा पैसा असतो. यामध्ये कट्टरतावादी देशांचा पैसा असतो, जे आतंकवाद्यांची निर्मिती करत आहेत. त्यामुळे देशातील सर्व मदरसे बंद केले पाहिजेत आणि तेथे शालेय शिक्षण चालू केले पाहिजे, अशी मागणी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केली.

केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणात दाऊद इब्राहिमच्या सहभागाची शंका ! – एन्.आय.ए.ने दिली न्यायालयात माहिती

एन्.आय.ए.ने यातील आरोपींच्या जामिनाला विरोध करतांना दाऊद इब्राहिम याचा केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणात सहभाग असल्याचे न्यायालयात सांगितले.यातून मिळणारा पैसा भारतविरोधी आणि आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात आहे.

‘बार्क’कडून ३ मासांसाठी टी.आर्.पी.ला स्थगिती

मुंबई पोलिसांनी टी.आर्.पी. घोटाळा उघडकीस आणल्यानंतर ‘बार्क’कडून हा निर्णय घेण्यात आला. ‘टी.आर्.पी. मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल ?, याचा आढावा घेण्यात येणार आहे’, असे ‘बार्क’ने सांगितले आहे.

एन्.डी.टी.व्ही. या वृत्तवाहिनीवर खोटे वृत्त प्रसारित केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचा आदेश

गुजरातच्या गांधीधाम येथील तनिष्क ज्वेलरीच्या दुकानावर लव्ह जिहादी विज्ञापनाच्या रागातून आक्रमण करण्यात आल्याचे खोटे वृत्त प्रसारित केल्याच्या प्रकरणी एन्.डी.टी.व्ही. या वृत्तवाहिनीवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिला.

ओडिशामध्ये घर सोडून गेलेल्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून २२ दिवस सामूहिक बलात्कार

भारतियांमधील नैतिकतेचा र्‍हास झाल्याचे दाखवणार्‍या या घटना आहेत. यास जनतेला आतापर्यंत साधना न शिकवणारे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत !

फिनलँडमध्ये अश्‍लील छायाचित्रे, संदेश पाठवणे लैंगिक छळ ठरणार

ऑनलाईन लैंगिक छळाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे फिनलँडच्या लैंगिक शोषण, छळाविषयीच्या कायद्यात सुधारणा केली जाणार असून यानुसार आक्षेपार्ह छायाचित्रे, संदेश, आक्षेपार्ह मौखिक संवाद आदीविषय लैंगिक छळाच्या व्याख्येत येणार आहेत.