जलयुक्त शिवार योजनेचे अन्वेषण करण्यासाठी लवकर विशेष अन्वेषण पथक नेमण्यात येईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

भारताचे नियंत्रक आणि लेखा परीक्षक यांनी दिलेल्या अहवालानुसार जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात पाण्याची पातळी वाढलेली नाही. उलट राज्यात टँकरची संख्या वाढली.

हिंदुत्वनिष्ठ नेते अजयसिंह सेंगर यांची ‘तनिष्क’ आस्थापनाच्या विरोधात मुंबई पोलिसात तक्रार प्रविष्ट

हिंदुत्वनिष्ठ नेते आणि महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी ‘तनिष्क’ या आस्थापनाच्या विरोधात मुंबई पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘तनिष्क’ आस्थापनाने डोहाळेजेवणाच्या विज्ञापनाच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले होते.

पुणे महानगरपालिकेचा पाणी वाटपाचा अजब कारभार

गेल्या एक मासापासून शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे एकीकडे धरणे भरली असूनसुद्धा दुसरीकडे नागरिकांना पाणी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तनिष्क आस्थापनाच्या विज्ञापनाचा हिंदु धर्माभिमान्याकडून निषेध 

धर्माविषयी जागरूक असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहेत.

उजनी धरणातून सव्वादोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू 

भीमा नदीच्या काठच्या अनेक गावांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे.

(म्हणे) ‘कर्मचारी, अधिकारी आदींच्या सुरक्षेसाठी विज्ञापन मागे घेत आहोत !’

हिंदूंनी त्यांचा धर्म, देवता, धार्मिक स्थळे, श्रद्धास्थाने यांचा अवमान किंवा त्यांच्यावर आक्रमण झाल्यावर आतापर्यंत कधीही कायदा हातात घेतलेला नाही. तरीही ‘हिंदू हिंसाचार करतील’, असे दाखवण्याच्या ‘तनिष्क’च्या या प्रयत्नालाही हिंदूंनी वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !

‘तनिष्क ज्वेलरी’च्या दुकानावर आक्रमण झाल्याचे ‘एन्.डी.टी.व्ही.’ने प्रसारित केले खोटे वृत्त !

‘तनिष्क ज्वेलरी’च्या दुकानावर आक्रमण करून व्यवस्थापकाला ‘लव्ह जिहादी’ विज्ञापनासाठी क्षमापत्र लिहून घेतल्याचे वृत्त ‘एन्.डी.टी.व्ही.’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते; मात्र ‘अशाप्रकारचे कोणतेही आक्रमण झालेले नाही’, असा खुलासा कच्छचे (पूर्व) पोलीस अधीक्षक मयुर पाटील यांनी केला.

‘द वायर’कडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘अतिरेकी हिंदुत्वाचे प्रिय प्रतीक’ असा उल्लेख करत घोर अवमान

या विरोधात मुंबईत विक्रोळी, अमरावती आणि रायगड येथे ‘द वायर’चे संपादक आणि लेखिका यांच्या विरोधात पोलीस तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीमध्ये गुन्हा नोंद करावा आणि आरोपींना त्वरीत अटक करावी’, असे म्हटले आहे.

सरकारी पैशांवर ‘कुराणा’चे शिक्षण दिले जाऊ शकत नसल्याने सर्व सरकारी मदरसे बंद करणार ! – आसाममधील भाजप सरकारचा निर्णय

केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असून त्यांच्या अखत्यारीतही सरकारी मदरसे चालू आहेत, तसेच शेकडो मदरशांना अनुदान दिले जाते, तेथेही भाजपने अशीच कृती करावी, असे हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘देहलीने जे हिसकावून घेतले, ते परत मिळवू !’

अशी धमकी देऊन मेहबुबा मुफ्ती या सरळसरळ कायदा आणि सुव्यवस्थेलाच आव्हान देत आहेत. संसदेत बहुमताने संमत झालेल्या निर्णयाला ‘अवैध’ म्हणणे, हा लोकशाहीचा अवमान नव्हे का ? सरकारने यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !