पैसे देऊन ‘टी.आर्.पी.’ वाढवल्याच्या प्रकरणी ‘हंसा रिसर्च ग्रुप’च्या माजी कर्मचार्‍याला उत्तरप्रदेशातून अटक

पैसे देऊन ‘टी.आर्.पी.’ वाढवल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने १२ ऑक्टोबर या दिवशी उत्तरप्रदेश येथील विनय त्रिपाठी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

‘तनिष्क ज्वेलरी’चे ‘लव्ह जिहादी’ विज्ञापन ‘टाटा ग्रुप’कडून मागे

‘टाटा ग्रुप’च्या मालकीच्या असणार्‍या तनिष्क ‘ज्वेलरी ब्रँड’च्या विज्ञापनातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्यावरून सामाजिक माध्यमांतून झालेल्या विरोधानंतर आस्थापनाने हे विज्ञापन मागे घेतले.

आंध्रप्रदेशातील चक्रीवादळ विशाखापट्टणम किनारपट्टीवरून मुंबईकडे जाण्याची शक्यता

गेल्या १०० वर्षांत अशी दुर्मिळ घटना घडल्याची नोंद झालेली नाही. हे चक्रीवादळ १५ ऑक्टोबरला दुपारपर्यंत मुंबईत पोचेल. त्यानंतर ते चक्रीवादळ कराचीकडे जाईल.

जपानी भाषा शिकवणार्‍या संभाजीनगरमधील शाळेची पंतप्रधानांनी घेतली नोंद

जपानी भाषेचे अभ्यासक सुनील जोगदेव हे गूगल मीटवर ऑनलाईन विनामूल्य धडे देतात. एक सकारात्मक वृत्त म्हणून त्याची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे घेतली आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यानेच असे विधान करणे चुकीचे ! – अजित पवार

कोरोनामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यातून गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत.

खान चाचा उपाहारगृहामधील हाणामारीत पोलीस आणि उपाहारगृह चालक घायाळ

खान चाचा उपाहारगृहामध्ये १० ऑक्टोबरच्या रात्री जेवणावरून पोलीस आणि उपाहारगृह चालक यांच्यात हाणामारी झाली.

पुण्यात भरदिवसा झालेल्या गोळीबारात वाळू व्यावसायिक घायाळ

पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात भरदिवसा गोळीबाराची घटना घडणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करते.

‘तनिष्क ज्वेलरी’चे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारे विज्ञापन

एका हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर गर्भवती झालेल्या मुसलमान तरुणीच्या  डोहाळ्याचे चित्रण करण्याचा विचार का झाला नाही ? असा प्रश्‍न कुणी विचारला तर त्यात चुकीचे ते काय ? जर असे विज्ञापन केले असते, तर देशातील धर्मांधांनी ते स्वीकारले असते का ?

जम्मू-काश्मीरमधील एका इस्लामी शाळेतील १३ विद्यार्थी आतंकवादी संघटनेत भरती

मदरशांतून आणि अशा शाळांतून काय शिकवले जाते, याचा शोध घेतला गेला पाहिजे आणि त्यांच्यावर कायमची बंदी घातली पाहिजे !

तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथील वीजपुरवठा खंडित

वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने याचा फटका लोकल रेल्वे सेवेला बसला.सिग्नल यंत्रणा बंद झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.