नियम न पाळल्याने २३ बियर बार चालकांवर कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत बार आणि मद्याच्या दुकानांच्या मालकांकडून सामाजिक सुरक्षित अंतर आणि इतर नियमांचे पालन होत नसल्याचे आढळल्याने शहर आणि ग्रामीण भागातील २३ बियर बार चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपिठाकडे १४ सहस्र ६९६ द्वितीय आवेदने आणि ६४९ तक्रारी प्रलंबित

गेल्या २ वर्षांपासून पुणे खंडपिठाला पूर्णवेळ माहिती आयुक्त लाभलेला नाही, असे माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले. त्यामुळे प्रलंबित आवेदनांची संख्या वाढत असून ४ वर्षांपूर्वीची २ सहस्र ४०० आवेदने प्रलंबित आहेत.

सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांच्या बैठकीत कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन 

डाक बंगला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी १० ऑक्टोबर या दिवशी घेतलेल्या महिला पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सुरक्षित अंतराचे पालन करणे या नियमाचे उल्लंघन करण्यात आले.

जम्बो रुग्णालयात रुग्णांना करावा लागत आहे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा व्यय

जम्बो रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन बाहेरून आणावी लागतील, असे सांगितले असून काही डॉक्टरांनी त्यांच्याकडील वापरलेली इंजेक्शन परत करण्याचा तगादा लावला आहे. 

आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मातोश्री श्रीमती शोभाताई कोरे यांचे निधन 

आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मातोश्री श्रीमती शोभाताई कोरे (वय ७७ वर्षे) यांचे १२ ऑक्टोबर या दिवशी सोलापूर येथे निधन झाले.

जोतिबा आणि चोपडाईदेवीची विशेष पूजा

देवालये जरी बंद असली, तरी मंदिरातील पुजारी, गुरव हे अडचणींमधून मार्ग काढत तितक्याच भावपूर्णतेने त्या त्या देवतांची पूजा करत आहेत.

अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना जिलेबी वाटप !

विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवाज् शिवभोजन थाळी केंद्रात गरजूंना जिलेबी वाटप

शिवाजी विद्यापिठात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यासन केंद्र चालू करा ! – मंजित माने, जिल्हाप्रमुख, युवासेना

नवीन पिढीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य समजण्यासाठी त्यांचे अध्यासन केंद्र चालू व्हावे.

महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या वतीने आज निदर्शने

राज्यात महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत

जिल्ह्यातील बहुतांश आगारांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी एस्.टी.च्या फेर्‍यांमध्ये वाढ

कोणतीही भाडेवाढ न करता नवीन मार्गांवर एस्.टी.च्या चालू करण्यात आल्या आहेत.