शांत निद्रा येण्यासाठी मार्गदर्शक सुत्रे

शक्यतो पूर्वेस किंवा दक्षिणेस डोके करून झोपावे. ‘पश्चिम किंवा उत्तर या दिशांना डोके करून झोपल्यास आयुष्याचा र्‍हास होतो’, असे विष्णु आणि वामन पुराणांत सांगितले आहे.

आश्‍विन मासातील शरद पौर्णिमेचे महत्त्व

‘वर्षभरात एक दिवस असा असतो, ज्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. तो दिवस आहे शरद पौर्णिमेचा दिवस !

गो उपचार !

नेदरलँडमध्ये (हॉलंडमध्ये) गो उपचार ही नवीन पद्धत रूढ होत आहे. यानुसार गायीला मिठी मारणे, तिला स्पर्श करणे, तिला कुरवाळणे असे प्रकार केले जातात. गायींच्या सहवासात घालवलेला थोडासा वेळ हा संबंधितांना लाभदायक ठरत आहे.

हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

हिंदूंनो, आपट्याचे पान देण्यामागील पुढील दृष्टीकोन समजून घ्या ! एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते आणि दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते !

नगर येथे महाविद्यालयीन तरुणीशी अश्‍लील चाळे करणार्‍या प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंद

औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक आरशू पिरमोहम्मद पटेल याने बीड जिल्ह्यातून आलेल्या २१ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला.

शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिरात साधेपणाने नवरात्रोत्सव

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने चतु:श्रृंगीदेवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांनी ७ दिवसांत मराठी ‘अ‍ॅप’ चालू न केल्यास दिवाळी आमच्या पद्धतीने साजरी करू ! – मनसेची चेतावणी

महाराष्ट्रात मराठी भाषेत ‘अ‍ॅप’ चालू करावे.= मनसेची चेतावणी

कृषी विधेयकाचा मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांना लाभ ! – पृथ्वीराज चव्हाण

मोदी शासनाने घाईगडबडीत ३ शेतकरी विरोधी विधेयके संसदेत संमत करून लोकशाहीचा गळा घोटला आहे.=पृथ्वीराज चव्हाण

महिलांनो, नवरात्रात विविध रंगांच्या साड्या नेसून नव्हे, तर देवीविषयीचा शुद्ध सात्त्विक भाव जागृत करून तिची कृपा संपादन करा !

या रंगाची साडी नसल्याने देवी मला प्रसन्न होणार नाही का ? माझे व्रत मोडले जाईल का ? देवीचा कोप होईल का ?’, असे अनेक प्रश्‍न ! नवरात्रोत्सव असा भीतीमय नसावा’.