हिंदी चित्रपटसृष्टीला काही जण अपकीर्त करत आहेत ! – खासदार जया बच्चन, समाजवादी पक्ष

हिंदी चित्रपटसृष्टीला काही लोक अपकीर्त करत आहेत. मनोरंजन विश्‍वातील लोकांना सामाजिक माध्यमांवर वाटेल ते बोलले जात आहे. ज्यांनी चित्रपटसृष्टीत राहून नाव कमावले, तेच आता तिला ‘गटर’ संबोधत आहेत. माझा याला पूर्ण विरोध आहे.

मुंबईसाठी सकाळी एशियाड, तर रात्री शयनयान एस्.टी. सेवा चालू  

२० ऑगस्टपासून राज्य परिवहन महामंडळाने एस्.टी. सेवा चालू केली आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता खास मुंबईसाठी सकाळी १०.४५ वाजता सांगली-मुंबई एशियाड आणि रात्री ९ वाजता सांगली-मुंबई (मिरज येथून रात्री ८.३० वाजता) शयनयान एस्.टी. सेवा चालू करण्यात आली आहे.

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत व्यापार्‍यांनी सहभागी व्हावे ! – अतुल शहा, अध्यक्ष, महाराष्ट्र व्यापारी महासंघ 

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासन पुष्कळ प्रयत्न करत आहेत; मात्र नागरिक त्याची गांभीर्याने नोंद घेतांना दिसत नाहीत. त्यामुळे व्यापार्‍यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून करवीर पोलीस ठाण्यातील काही पोलिसांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप करत करवीर तालुक्यातील सुनील शांताराम बागम या तरुणाने १२ सप्टेंबरला दुपारी रंकाळ्यात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर येथील वृद्ध महिलेचे निवृत्तीवेतन रिक्शातील अन्य बुरखाधारी महिलांनी पळवले

गजराबाई शिंदे नावाची वृद्ध महिला निवृत्तीवेतनाची ३१ सहस्र रुपये रक्कम अधिकोषातून काढून रिक्शातून घरी निघाल्या होत्या. तेव्हा रिक्शातील अन्य बुरखाधारी महिलांनी त्यांच्या पिशवीतील रक्कम सदरबझार परिसरात लंपास केली

चीनकडून भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह १० सहस्र महत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी

चीनच्या ‘झेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड’ या आस्थापनाकडून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे १० सहस्र अतीमहत्त्वाच्या भारतियांची हेरगिरी करण्यात येत असल्याचे वृत्त ‘दि इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.

देहलीतील दंगलीच्या प्रकरणी जे.एन्.यू.चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक

देहलीमध्ये फेब्रुवारी मासामध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणी देहली पोलिसांच्या विशेष शाखेने जे.एन्.यू. विश्‍वविद्यालयाचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अवैधकृत्यविरोधी कायद्याच्या अंतर्गत (यु.ए.पी.ए. अंतर्गत) अटक केली आहे.

चीन आणि पाक येथून होते अमली पदार्थांची तस्करी ! – भाजपच्या खासदाराचा दावा

देशात पाकिस्तान आणि चीन या देशांतील अमली पदार्थांची तस्करी होत आहे. देशातील तरुण पिढीला उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे. भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अमली पदार्थांचा प्रवेश झाला आहे. याविषयी ‘केंद्रीय अमली पदार्थ विरोधी विभागा’कडून अन्वेषण होत आहे.

घरी मराठीत बोलतांना मुलांकडून हिंदी शब्दांचा अधिक वापर ! – ७० टक्के पालकांचे मत

सध्या हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांची सरमिसळ करून मराठी भाषा सर्वत्र बोलली जाते. यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, असे १४ सप्टेंबर या दिवशी असलेल्या हिंदी भाषादिनानिमित्त १२ शहरांत केलेल्या एका सर्वेक्षणातून आढळून आले.

समलैंगिक विवाहाला आपला कायदा, समाज आणि मूल्ये मान्यता देत नाहीत ! – केंद्र सरकारची देहली उच्च न्यायालयात भूमिका

विवाह एक संस्कार असून आपला कायदा, आपला समाज आणि आपली मूल्ये अशा विवाहांना मान्यता देत नाहीत, जे समलिंगी व्यक्तींमध्ये होतात.