राजापूर तालुक्यात १५० हून अधिक बचत गटांनी केली ७ हेक्टर क्षेत्रात हळदीची लागवड

तालुक्यात १५० हून अधिक बचत गटांनी तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक बचत गटांनी सुमारे ७ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी अनुमाने ३ हेक्टरने लागवडीच्या या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.

देवद (पनवेल) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

सध्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्तपुरवठा अल्प पडत असल्याने रक्तदान हेच जीवनदान आणि सर्वश्रेष्ठ दान समजले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर ६ सप्टेंबर या दिवशी देवद गाव येथे ‘जय हनुमान युवा मित्र मंडळा’च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कोविड केंद्रात विवाहितेवर बलात्कार करणार्‍या बाऊन्सरला अटक

जूनच्या पहिल्या आठवड्यात येथील कोविड केंद्रात २० वर्षीय विवाहितेवर बाऊन्सरने सलग तीन दिवस बलात्कार केला. बलात्काराची घटना जूनच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. विवाहिता गर्भवती राहिल्यानंतर तिने याविषयी आपल्या पतीला सांगितले.

महिलांनो, नवरात्रोत्सवात देवीच्या मारक रूपाची उपासना करून स्वत:तील शौर्य जागृत करा ! – कु. प्रियांका लोणे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

कलियुगात महिलांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. सर्वच वयोगटांतील महिलांवर अत्याचार होत आहेत. बलात्कार, एकतर्फी प्रेमातून हत्या, लव्ह जिहाद, हुंडाबळी अशा अनेक प्रसंगांना महिलांना सामोरे जावे लागत आहे.

१५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत माझे कुटुंब माझे दायित्व मोहीम ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करण्यात येणार आहेत.

महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता महिलांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन मनोबल उंचावणे आवश्यक आहे. महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षमही व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले.

विदर्भस्तरीय ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सद्यस्थितीत महिलांवरील वाढते अत्याचार बघता महिलांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक असल्याने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच महिलांसाठी विदर्भस्तरीय ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान घेण्यात आले.

देहली दंगल प्रकरणातील आरोपपत्रात माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, आपचे माजी नेते योगेंद्र यादव यांच्यासह अनेकांची नावे

या सर्वांनी ‘केंद्र सरकारच्या सीएएला विरोध करतांना कोणत्याही सीमा ओलांडा’, अशी चिथावणी दिली होती. यासह सीएए आणि एन्.आर्.सी. हे मुसलमानविरोधी असल्याचा अपप्रचार करून मुसलमान समाजाला चिथवले !

‘फेसबूक’कडून सनातन संस्थेची ५ ‘फेसबूक’ पाने आणि २ ‘इन्स्टाग्राम’ खाती यांवर बंदी

फेसबूकचा हा हिंदुद्वेषच होय ! आतंकवादी आणि त्यांच्या संघटना यांच्या फेसबूक पानांवर बंदी घालण्याऐवजी हिंदु धर्माचा शास्त्रीय भाषेत प्रसार करणार्‍या सनातन संस्थेच्या लिखाणाला ‘आक्षेपार्ह’ ठरवणे, हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार होय !