पाकमध्ये विदेशी महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार

येथे एका विदेशी महिलेचे अपहरण करून तिच्या मुलांसमोर तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याविरोधात ठिकठिकाणी निदर्शन केली जात आहेत.

अ‍ॅन्टीजेन चाचणी नकारात्मक आल्यास रुग्णाची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करण्याचे निर्देश

कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची अ‍ॅन्टीजेन चाचणी नकारात्मक आल्यास पुन्हा त्या रुग्णाची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनेक मोठ्या राज्यांमध्ये केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर लक्षणे असूनही अ‍ॅन्टीजेन चाचणी नकारात्मक आल्यास पुन्हा त्या रुग्णाची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१० ते २०२० या कालावधीतील लेखापरीक्षणाचे कामकाज अपूर्ण असल्याचा आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१० ते २०२० या कालावधीतील लेखापरीक्षणाचे कामही पूर्ण झालेले नाही. कागदपत्रे गहाळ झाल्यामुळेच माहिती मिळू शकत नाही, असा आक्षेप प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी नोंदवला आहे.

पुण्यात आवश्यकता असल्यास पुन्हा जनता संचारबंदी लागू करा ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यकता असल्यास पुन्हा जनता संचारबंदी लागू करा, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ११ सप्टेंबर या दिवशी प्रशासनाला केली.

आर्.टी.ओ. चार्जच्या नावाखाली वितरकांकडून ग्राहकांची लूट

वाहनांची विक्री करतांना वितरक ग्राहकांकडून आर्.टी.ओ. चार्जेसच्या नावाखाली घेत असलेल्या शुल्काची वसुली अद्यापही चालूच आहे. या प्रकारे गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांची लूट केली जात असून परिवहन विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

५ वर्षांपासून पसार असलेल्या समृद्ध जीवनच्या संचालकांना सीआयडीने केली अटक

समृद्ध जीवन फूड्स इंडिया आस्थापनाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गेल्या ५ वर्षांपासून पसार असलेल्या दोघा संचालकांना पुण्यातून अटक केली आहे. ऋषीकेश वसंत कणसे आणि सुप्रिया वसंत कणसे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सांगलीत ‘जनता कर्फ्यू’ला अत्यल्प प्रतिसाद 

वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्यात ११ सप्टेंबरपासून ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन करण्यात आले होते; मात्र याला सांगली-मिरज शहरात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मारुति रस्ता, हरभट रस्ता, कापड पेठ यांसह मिरज शहरातील काही बाजारपेठा चालू होत्या.

चढ्या दराने निविदा मान्य करून शासनाची फसवणूक करणार्‍या कोरोना साहित्य पुरवठादारांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद करा ! – दौलत देसाई, कोल्हापूर जिल्हाधिकारी

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अपलाभ उठवून उत्पादन मूल्य किंवा प्रचलित बाजार भावापेक्षा अधिक दराने निविदा मान्य करून शासनाची फसवणूक करणार्‍या पुरवठादारांची चौकशी करून फौजदारी गुन्हे नोंद करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

सीमेवरील तणाव अल्प करण्यासाठी ५ कलमी कार्यक्रमावर भारत आणि चीन यांच्यात एकमत

प्रथम स्वतःच कुरापती काढायच्या, नंतर भारताशी चर्चा करून परिस्थिती पूर्वपदावर येऊ द्यायची आणि नंतर पुन्हा घुसखोरी करून कुरापती काढायच्या, हा चीनचा उद्योगच बनला आहे. त्यामुळे चर्चा नव्हे, तर त्याचे कुरापती काढण्याचे धाडसच होऊ नये, यासाठी त्याला लक्षात राहील असा धडा शिकवणे आवश्यक !

चीन पँगाँग तलावाजवळील ‘फिंगर ३’ भाग कह्यात घेण्याच्या प्रयत्नात

चिनी सैन्याकडून होऊ शकणारी संभाव्य घुसखोरी विचारात घेऊन भारतीय सैन्याने फिंगर ३ वर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. चिनी सैन्यानेही येथे मोठ्या प्रमाणावर सैनिकांच्या संख्येत वाढ केली आहे. येथून फिंगर ४ भागाच्या दिशेने पश्‍चिमेकडून पुढे सरकण्याचा चीनचा डाव आहे.