पुणे शहरातील डोंगरमाथा आणि डोंगर उतार निवासी करण्याचा घाट

कोथरूड, बिबवेवाडी आणि शिवाजीनगर भागातील डोंगरमाथा आणि डोंगर उतारावरील २५ हेक्टर जमिनीचे निवासीकरण करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. जागेचे सर्वेक्षण करून, त्याचे नकाशे बनवून राज्यशासनाच्या नगर विकास विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याची चर्चा आहे.

कोरोनाच्या आव्हानाला आपण संधी म्हणून पहायला हवे ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कोरोनाच्या संकटकाळात सर्वांनी समर्पणाच्या भावनेतून काम केल्यास आपण नक्कीच कोरोनाला हरवू शकतो. कोरोना महामारीच्या या आव्हानाला आपण संधी म्हणून पहायला हवे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

सिंधुदुर्गात ७५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले

गेल्या २४ घंट्यांत नवीन ७५ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ सहस्र २४९ झाली आहे. त्यांपैकी आतापर्यंत १ सहस्र १५३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिक आणि महानगरपालिका यांना रोखावे ! – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

अभिनेत्री कंगना राणावत यांच्या कार्यालयावर महानगरपालिकेने सूडबुद्धीने कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आणि शिवसैनिक यांना रोखावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद केले.

नगर येथील पुरोहित संघाचा पुढील १५ दिवस दशक्रिया विधी न करण्याचा निर्णय

कोरोनाच्या कारणास्तव १४ ते २९ सप्टेंबर या काळात येथील पुरोहित संघटनेने अमरधाममध्ये दशक्रिया विधीसह अन्य कोणतेही विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंत्यविधीसमवेत दशक्रिया विधीसाठीही हेळसांड होणार आहे.

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या १०२ व्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ !

घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत् भक्ती आणि नामस्मरण यांशिवाय अन्य कुठलाही पर्याय नाही, हे सामान्य जीवांना उलगडून सांगणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे पट्टशिष्य-शिष्योत्तम श्री ब्रह्मानंद महाराज यांचा १०२ वा पुण्यतिथी उत्सव.

ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा ! – ब्राह्मण संघटनांची राज्यातील विविध नेत्यांकडे मागणी

ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, तसेच ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी कोथरूड येथील माजी आमदार प्रा. (सौ.) मेधाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यातील ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्याच्या विविध नेते, मंत्री यांच्याकडे केली.

नितीमूल्यांच्या संवर्धनानेच विद्यार्थी परिपूर्ण सिद्ध होतो ! – डॉ. रघुनाथ माशेलकर

शिक्षक विद्यार्थी घडवतात आणि तेच विद्यार्थी पुढे देश घडवतात. म्हणजे शिक्षकच देश घडवण्याचे महत्त्वाचे काम करतात, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विश्‍वस्त आणि प्रकल्प प्रमुख शैलेश शाह यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुणे येथे मास्क न घातल्याने कारवाई करणार्‍या पोलिसाला २ धर्मांधांकडून मारहाण

मास्क न घातल्याने कारवाई केल्याच्या रागातून इलियास हासिम आतिया आणि हासिम इलियास आतिया या दोघांनी पोलीस हवालदाराला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करणार्‍यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सातारा नगरपालिका सीमावाढीला अनुमती, लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

अनुमाने ४० वर्षे प्रतिक्षेत असलेल्या सातारा शहर सीमावाढीच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुमती दिली. याविषयीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा-जावली विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सोपवले.