स्वरक्षणासाठी प्रशिक्षण शिकून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

कलियुगात महिलांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. सर्वच वयोगटांतील महिलांवर अत्याचार होत आहेत. बलात्कार, एकतर्फी प्रेमातून हत्या, लव्ह जिहाद, हुंडाबळी अशा अनेक प्रसंगांना महिलांना सामोरे जावे लागत आहे.

वरळी (मुंबई) येथील हिंदसायकल गणेशोत्सव समितीचा प्रतिवर्षी सात्त्विक आणि छोटी मूर्ती आणण्याचा निश्‍चय !

या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने ३ फुटांपर्यंतच श्री गणेशमूर्ती आणण्याचे आवाहन केले होते. यानुसार मुंबईतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी छोटी मूर्ती आणली.

धमक्यांचे दूरभाष मलाही येत होते; पण मी ते गांभीर्याने घेत नाही !  शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मला यापूर्वीही धमक्यांचे अनेक दूरभाष आले होते. मी त्या वेळीही त्याला गंभीरपणे घेतले नाही आणि आजही गंभीरपणे घेत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचे दूरभाष आले होते.

चीनजवळील भारतीय सीमेत अचानक वाढली याक प्राण्यांची संख्या : चीनवर हेरगिरीचा संशय

पँगाँग  – येथील तलावाजवळ असलेल्या भारतीय सीमेत अचानकपणे याक प्राण्यांची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा चीनच्या हेरगिरीचा एक प्रकार आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोरोनाचा वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी लक्ष केंद्रीत

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट देऊन कोणत्याही परिस्थितीत कोरोना मृत्यूदर रोखा, अशी सूचना केली. अन्य तज्ञांच्या सूचनांची नोंद घेऊन महापालिकेने मृत्यूदर रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्यावर भर देण्याचे निश्‍चित केले आहे.

‘स्मार्टसिटी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून रूबल अगरवाल यांना हटवले

स्मार्ट सिटी’मध्ये मानांकन घसरलेल्या पुणे ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अगरवाल यांना हटवण्यात आले असून त्यांचा अतिरिक्त पदभार पुण्यात बदली झालेले धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांच्याकडे देण्यात आला आहे.

पंचगंगा स्मशानभूमीत सेवा करण्यासाठी महापालिका आणखी १५ कर्मचारी देणार 

पंचगंगा स्मशानभूमीवरील वाढता ताण पहाता आणखी १५ कर्मचारी देण्याची सिद्धता महापालिका प्रशासनाने केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रतिदिन ५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. सध्या केवळ १५ कर्मचारीच रात्रंदिवस अंत्यसंस्काराचे काम करत आहेत. या कर्मचार्‍यांना उसंत मिळण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनीही सेवा देण्याची सिद्धता दाखवली आहे.

उपचारांसाठी रुग्णालयात जाण्यास विलंब होत असल्यानेच अधिक रुग्णांचा मृत्यू 

पुणे शहर, जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर उपचारांसाठी सरकारी, खासगी रुग्णालयात जाण्यास विलंब होत असल्यानेच रुग्णांचा मृत्यू झपाट्याने होत असल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे. मृतांमध्ये चौथ्या दिवशी उपचारास जाणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे.

‘धन्वंतरी स्वास्थ्य’ वैद्यकीय योजना बंद केल्याने पालिका कर्मचार्‍यांकडून निषेध 

धन्वंतरी स्वास्थ्य’ ही वैद्यकिय योजना १ सप्टेंबर २०१५ पासून लागू करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या कालावधीत महापालिकेतील कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. त्यांच्यासाठी ‘धन्वंतरी स्वास्थ्य’ ही वैद्यकीय योजना लाभदायक ठरत होती; पण प्रशासकीय कारणास्तव ही योजना १४ सप्टेंबरपासून थांबवण्यात येत आहेत.

कोरोनाचे रुग्ण वाढूनही रेल्वेचे ४८२ ‘क्वारंटाइन कोच’ वापराविना पडून 

रुग्णालयांची संख्या कमी पडेल या दृष्टीने कोरोना रुग्णांसाठी रेल्वे बोर्डाने एक्स्प्रेसचे डबे विलगीकरण कक्षात परावर्तित केले आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या ५ विभागांत एकूण ४८२ विशेष ‘कोरोना विलगीकरण कोच’ तयार करण्यात आले आहेत.