पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी यांचा सन्मान राखावा ! –  डॉ. विकास महात्मे, खासदार

एकता कपूर निर्मित वेब सिरीज व्हर्जिन भास्कर -२ मध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी यांना अवमानित करण्यात आले आहे, यावर तत्परतेने कारवाई करून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी यांचा सन्मान राखावा, अशी मागणी पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ञ आणि खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केली आहे.

बेळगांव येथे रुग्णाच्या कुटुंबियांची रुग्णालयावर दगडफेक 

कोरोनाबाधित रुग्णाचा ‘ऑक्सिजन’अभावी मृत्यू झाल्याचा आरोप करून रुग्णाच्या कुटुंबियांनी मंडोळी रस्त्यावरील मून रुग्णालयावर दगडफेक केली आहे. घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन संतप्त कुटुंबियांना शांत करत तक्रार देण्यास सांगितले.

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचे निधन

भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे उद्गाते आणि ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचे ७ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता पुण्यात निधन झाले. डॉ. गोविंद स्वरूप हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जातात.

पुण्यात मास्कचा वापर टाळणार्‍यांची संख्या अधिक

कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तरीही काही नागरिक मास्क वापरणे टाळत आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन

७ सप्टेंबर या दिवशी आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी नरवीर रामे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

जम्बो कोविड रुग्णालयातील अनागोंदीच्या प्रकरणी लाइफलाइन या एजन्सीवर कारवाई करण्याचे निर्देश

शिवाजीनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयातील त्रुटी आणि अनागोंदी कारभाराच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित रुग्णालयाचे संचालन करणार्‍या लाइफलाइन या एजन्सीवर कारवाई करण्याचे निर्देश पुणे महापालिकेने पुणे महानगर विकास प्राधिकरणाला (पी.एम्.आर्.डी.ए.) दिले आहेत.

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र खासगी आस्थापन

जिल्हा परिषदेच्या राज्य सरकारकडील प्रलंबित प्रश्‍नांसाठी पवार यांनी ६ सप्टेंबर या दिवशी आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत जिल्ह्यातील घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्पाचे पवार यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.

सोलापूर जिल्हा आरोग्य विभागातील पर्यवेक्षिकेचा कोरोनाने मृत्यू

माढा तालुक्यातील आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिकेचा कोरोनाने ७ सप्टेंबर या दिवशी मृत्यू झाला.

कोरोना महामारीमुळे भारतीय नागरिकांच्या मानसिक समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

कोरोनामुळे एप्रिल ते ऑगस्ट या काळात झालेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या मानसिक समस्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे.

पुणे येथील खासगी प्रयोगशाळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

कोरोना चाचणीचा अहवाल देण्यात विलंब करणार्‍या लॅबोरेटरी सर्व्हिसेस बायोसायन्सेस प्रा. लिमिटेड, क्रस्नाडायग्नोस्टिक प्रा. लिमिटेड आणि ए.जी. डायग्नोस्टिक प्रा. लिमिटेड या ३ प्रयोगशाळांना महापालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे.