श्री गणेशमूर्तींची कचर्‍याच्या गाडीतून वाहतूक करणार्‍या संबंधितांवर कारवाई करा ! – विहिंप-बजरंग दलाचे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन

इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाने विसर्जनाच्या वेळी कृत्रिम कुंडातील मूर्तींची कचर्‍याच्या गाडीतून वाहतूक केली. या कृतीमुळे हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन येथील प्रांताधिकारी कार्यालयात विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी दिले आहे.

सोलापूर येथील श्री सिद्धेश्‍वर मंदिर भाविकांसाठी खुले करा !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या धर्तीवर सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्‍वर मंदिर दर्शनासाठी खुले व्हावे, यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धेश्‍वर मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे आर्थिक अधिकार काढले

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यावर लाच घेतल्याच्या आरोपामुळे आयुक्तांनी त्यांचे आर्थिक अधिकार काढून घेतले.

विविध मागण्यांसाठी नगर जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी केले आंदोलन

आरोग्यसेवा परिचारिका संघटनेच्या वतीने नगर येथील जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी काळ्या फिती लावून रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले. कोणतीही रुग्णसेवा खंडित न होता ७ सप्टेंबरपर्यंत हे आंदोलन चालू रहाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील काही ग्रामीण गावांमध्ये जनता कर्फ्यू

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी अत्यावश्यक सेवा वगळता स्वयंस्फूर्तीने ‘गाव बंद’ पाळण्यास आरंभ केला आहे.

एकता कपूर यांच्या वेब सिरीजमध्ये पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान

‘व्हर्जिन भास्कर -२’ या वेब सिरीजमध्ये ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी गर्ल्स हॉस्टेल’चे नाव आणि त्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहेत. या मलिकेत शारीरिक संबंधांचा विषय मांडण्यात आला आहे. अशा मालिकेत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांचा अपमान करण्यात आला आहे.

‘पत्रकार गौरी लंकेश यांची नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधातून हत्या झाली आहे का ?’, या दिशेने अन्वेषण करण्याची ट्विटरवर मागणी

पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ या दिवशी बेंगळुरू येथे अज्ञातांकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच साम्यवादी आणि प्रसारमाध्यमे यांनी संशयाची सुई हिंदुत्वनिष्ठांच्या दिशेने फिरवली. आतापर्यंत या हत्येच्या आरोपाखाली अनेक निरपराध हिंदूंना अटक करण्यात आली आहे; परंतु पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही

(म्हणे) ‘आजच्या घडीला युद्ध झाले, तर भारताचा पराभव होईल !’

चीनची भारताला धमकी ! युद्धाची खुमखुमी असलेल्या चीनला भारत सरकारने त्याला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देऊन त्याची जागा दाखवून दिली पाहिजे !

गौरी लंकेश यांचे नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधाची चौकशी करा ! – धर्मप्रेमी हिंदूंचे ‘ऑनलाईन’ आंदोलन

गौरी लंकेश यांच्या हत्येला ५ सप्टेंबर २०२० या दिवशी ३ वर्षे झाल्याच्या निमित्ताने पुरोगामी बुद्धीवाद्यांनी कर्नाटकात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या विरोधात संपूर्ण राज्यातील धर्मप्रेमींनी ऑनलाईन आंदोलन केले.

सर्वोच्च न्यायालयाकडून चर्चच्या शाळांतील शैक्षणिक शुल्क भरू न शकणार्‍या विद्यार्थ्यांवर सक्तीची कारवाई न करण्याचा आदेश कायम

सर्वोच्च न्यायालयाने चर्चच्या ६ शाळांना शैक्षणिक शुल्क भरू न शकणार्‍या विद्यार्थ्यांविरुद्ध सक्तीची कारवाई करण्यापासून रोखण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.