‘एथिस्ट रिपब्लिक डॉट कॉम’चा संस्थापक अर्मिन नवाबी याच्याकडून श्री महाकाली देवीचा अश्‍लाघ्य अवमान

इराणी वंशाचा कॅनडामध्ये रहाणारा आणि ‘एथिस्ट रिपब्लिक डॉट कॉम’ या संकेतस्थळाचा धर्मांध संस्थापक अर्मिन नवाबी याने हिंदूंच्या श्री महाकाली देवीचे एक अश्‍लील चित्र ट्विटरवर प्रसारित करून तिचा अवमान केला आहे.

अरुणाचल प्रदेशातील ५ नागरिकांचे चिनी सैन्याकडून अपहरण ! – काँग्रेसच्या आमदाराचा दावा

अरुणाचल प्रदेशमधील सुबनसिरी जिल्ह्यातील ५ भारतियांचे चिनी सैन्याने अपहरण केल्याचा दावा काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली, तसेच त्यांनी या ५ जणांची नावेही दिली आहेत.

मशीद समितीने २० वर्षांपूर्वी अवैधरित्या कह्यात घेतलेली मंदिराची १० एकर भूमी आता जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणात

येथील विरुगंबक्कम् भागामधील अरुलमिगु सुंदरा वरदराज पेरुमल मंदिराची १० एकर भूमी जिल्हाधिकार्‍यांनी मशीद समितीकडून परत घेतली आहे.  

‘गनिंग फॉर द गॉडमॅन : द ट्रू स्टोरी बिहाईंड द आसाराम बापू कन्व्हिक्शन’ या पुस्तकाच्या प्रकाशनास न्यायालयाकडून पुढील सुनावणीपर्यंत मनाई

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या प्रकरणावरील ‘गनिंग फॉर द गॉडमॅन : द ट्रू स्टोरी बिहाईंड द आसाराम बापू कन्व्हिक्शन’, हे पुस्तक प्रकाशित करण्यास पटियाला हाऊस न्यायालयाकडून पुढील सुनावणीपर्यंत मनाई करण्यात आली आहे.

ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन व्हेंटिलेटर बसवावेत ! – भाजप युवा मोर्चा

ग्रामीण भागामध्ये असणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना प्राथमिक उपचार मिळण्यासाठी विलगीकरण कक्षाची सोय, तसेच ऑक्सिजन व्हेंटिलेटर लवकरात लवकर बसवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजप युवा मोर्चाच्या वतीने जिल्हा परिषद मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे.

बारामती (जिल्हा पुणे) येथे ७ सप्टेंबरपासून १४ दिवसांसाठी जनता कर्फ्यू

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शहर आणि तालुका येथे १४ दिवसांसाठी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ४ सप्टेंबर या दिवशी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यू लागू रहाणार आहे.

अमेरिकेतील ५ राज्यांत हिंदूंची मते निर्णायक ठरणार

‘‘अमेरिकेत अनुमाने २० लाख हिंदू असून वरील राज्यांत निकाल फिरविण्याची क्षमता (स्विंग स्टेटस्) त्यांच्यात आहे. हिंदूंचा ‘वसुधैव कुटुंबकम’ या मूल्यावर विश्‍वास आहे. त्याची जपणूक डेमोक्रॅटिक पक्षाचे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन आणि भारतीय वंशाच्या उपराष्ट्रध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस हेच दोघे करू शकतात.”

पुण्यात ‘जम्बो कोविड सेंटर’मधील असुविधा दूर करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक

‘जम्बो कोविड सेंटर’मधील असुविधा दूर करून वैद्यकीय व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्याची मागणी मनसेच्या महिलाध्यक्षा रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली आहे. ३ सप्टेंबर या दिवशी त्यांनी आंदोलन करत फाटकावरून चढून ‘जम्बो सेंटर’मध्ये प्रवेश केला. विभागीय आयुक्तांनाही त्यांनी या वेळी रुग्णांची हेळसांड होत असल्याविषयी जाब विचारला.

बीड येथे रस्त्याच्या मागणीसाठी चिखलात स्वत:ला पुरून घेत युवकांचे आंदोलन 

गितेवाडी येथील रस्त्याची दुरवस्था होऊन अनेक वर्षे लोटूनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. ग्रामस्थांनी निवेदन देऊन अनेक वेळा मागणी करूनही काहीच कार्यवाही न झाल्याने वैतागलेल्या युवकांनी सामाजिक कार्यकर्ते चांगदेव गिते यांच्या नेतृत्वाखाली चिखलात स्वत:ला पुरून घेत आंदोलन केले.

पाबळ (जिल्हा पुणे) येथे लाच मागणारा मंडल अधिकारी कह्यात

वाळू चोरी संदर्भातील गुन्हा आणि त्यासंबंधी कायदेशीर प्रक्रिया न करण्यासाठी १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना शिरूरमधील पाबळच्या अमोल खोल्लम या मंडल अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. त्यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.