जुन्नर तालुक्यातील आणे गावात श्री कालिकादेवीच्या मंदिरात भरदिवसा चोरी

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या काही मासांपासून मंदिरे देवदर्शनासाठी बंद आहेत. याचाच अपलाभ घेत जुन्नर तालुक्यातील आणे गावात श्री कालिकादेवीच्या मंदिरात भरदिवसा देवीचा १ किलो २०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट आणि देवीच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे मंगळसूत्र अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात श्री गणेशाचे आशीर्वाद घेऊन हिंदूंचे संघटन करण्यासाठी सिद्ध होऊया ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, महाराष्ट्र

सद्यपरिस्थिती पहाता कोरोना महामारीच्या काळातही हिंदूंचे सण हे साजरे होत आहेत; कारण ते उत्साह निर्माण करणारे आणि विजयाचे प्रतीक आहेत. श्री गणेशाने महोदर, मयुरेश्वर, महोत्कट अशा अनेक अवतारांत दैत्यांचा संहार करून धर्म आणि भक्त यांचे रक्षण केले.

अभिनेत्री कंगना राणावत यांचा चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर अमली पदार्थ सेवनाचा थेट नावे घेऊन आरोप

अभिनेत्री कंगना राणावत यांनी चित्रपट सृष्टीतील कलाकारांची थेट नावे घेऊन अमली पदार्थ सेवनाचा आरोप केला आहे.

पोलिसांवर सत्ताधारी पक्षांचा दबाव – माजी पोलीस आयुक्त

आजघडीला सर्व पोलीस दलांवर सत्ताधारी पक्षांचा आणि लोकांचा दबाव आहे. मुंबई पोलीस दबावाखाली काम करत नव्हते, याविषयी मला निश्चिती नाही, अशी प्रतिक्रिया माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केली आहे.

नवरात्रोत्सवाची नियमावली वेळीच घोषित करावी ! – आशिष शेलार, भाजप

गणेशोत्सव संपण्यापूर्वीच मूर्तीकार नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्ती सिद्ध करायला घेतात. अनेक मराठी बांधव मूर्तीकार आणि कर्मचारी यांचे पोट यांवर अवलंबून आहे. गणेशोत्सवाच्या वेळी नियमावली विलंबाने घोषित केल्यामुळे अनेक मूर्ती पडून राहिल्या.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी रामरत्न एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपाची ऑक्सिजन व्यवस्था

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते. सध्या सर्वत्र ऑक्सिजनची टंचाई भासत आहे. याची आवश्यकता लक्षात घेऊन रामरत्न एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे.

दापोली (रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाकडून जागतिक नारळदिन साजरा

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या वतीने जागतिक नारळदिन साजरा करण्यात आला. या वर्षी ३ जून या दिवशी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामधे येथील नारळाच्या बागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती.

आरे (मुंबई) येथील ६०० एकर भूमी ‘जंगल’ म्हणून घोषित करणार ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

भारतीय वन कायद्याच्या कलम ४ नुसार राज्यशासन आरे येथील ६०० एकर भूमी ‘जंगल’ म्हणून घोषित करणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. यामुळे येथील आदिवासींचे हक्क कायम रहातील, असे त्यांनी म्हटले.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आणखी ३ मास राखीव

राज्यातील सर्व खासगी आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेली रुग्णालये यांमधील शासनाने दर नियंत्रित केलेल्या ८० टक्के खाटा कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी राखीव ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला राज्यशासनाने ३ मासांची मुदतवाढ दिली आहे.

१० वर्षांपासून पुणे पोलिसांना चकवा देणारा आरोपी पोलिसांच्या कह्यात

१० वर्षांपासून पुणे पोलिसांना चकवा देत वेगवेगळ्या नावाने आणि वेषांतर करून रहाणार्‍या प्रवीण दत्तात्रय पायगुडे (वय ३१ वर्षे) या आरोपीला कोथरुड पोलिसांनी सापळा रचून अटक केली.