कागल नगरपालिकेकडून मास्क घालून न फिरणार्‍यांकडून एका दिवसात १८ सहस्र रुपये दंड वसूल

शासनाने दळणवळण बंदी शिथिल केल्यावर नागरिकांचे सामाजिक अंतर पाळणे आणि मास्क लावणे यांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे २९ जून या दिवशी नगरपालिकेने मास्क न लावणार्‍यांवर कारवाई केली.

शेजारील जिल्ह्यात काम करणार्‍या कामगारांना ये-जा करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ ! – जिल्हाधिकारी

राज्यशासनाने दळणवळण बंदीचा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे. सांगली जिल्ह्याच्या सीमेला लागून असणार्‍या जिल्ह्यातील उद्योग घटकांमध्ये कामास असणार्‍या कामगारांना ये-जा करण्यासाठी ३० जूनपर्यंतचे दैनंदिन पास देण्यात आले होते.

पुण्यात ऑनलाईन वेशाव्यवसाय करणार्‍या चौघांना अटक 

चतु:श्रुंगी पोलिसांना पाषाण टेकडीजवळील रो हाऊसमध्ये ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून चौघांना अटक केली आहे.

कोथरूड मधील ३१ वर्षीय महिलेची सायबर चोरांकडून लुबाडणूक

कौन बनेगा करोडपती या मालिकेकडून २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याची माहिती देऊन सायबर चोरांनी महिलेची ४ लाख १५ सहस्र रुपयांची फसवणूक केली.

वीजदेयकांच्या भरमसाठ रकमेने नागरिक त्रस्त !

महावितरण आस्थापनाने ३ मासांची वीजदेयके भरमसाठ रकमेने आकारल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.

रत्नागिरीत १९ नवीन रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या ५९९ वर पोचली

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील २४ घंट्यांत १९ नवीन रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५९९ झाली आहे.

जे.जे. रुग्णालयात महिला आधुनिक वैद्याचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘वॉर्डबॉय’ला अटक 

मुंबईतील जे.जे. रुग्णालयात एका शिकाऊ महिला आधुनिक वैद्याचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ‘वॉर्डबॉय’ला अटक केली आहे.

योगगुरु रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार

पतंजलीने सिद्ध केलेल्या कोरोनील या औषधाने उपचार केल्यास कोरोनाबाधित व्यक्ती कोरोनामुक्त होऊ शकते, अशी घोषणा केल्याच्या प्रकरणी योगगुरु रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात जुन्नर येथील प्रथमश्रेणी न्यायालयात फौजदारी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

रिक्शाचालकांना साहाय्य मिळण्यासाठी रिक्शा विकणे आहे आंदोलन 

कर्नाटक, आंध्रप्रदेश शासनाने स्थानिक रिक्शाचालकांसाठी आर्थिक पॅकेज घोषित केले. त्याच धरतीवर महाराष्ट्र शासनानेही रिक्शाचालकांना आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी रिक्शाचालकांनी केली आहे.

नांदेड येथील शिवारात १४ गोवंशीय मृतावस्थेत आढळलेे ः कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय

शिवारात १४ गोवंशीय मृतावस्थेत आढळलेे असून संबंधितांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी विश्‍व हिंदु परिषदेने केली आहे.