ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करण्याच्या जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या प्रस्तावाला राष्ट्रप्रेमींचा विरोध

आतंकवाद्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देऊ पहाणार्‍या जम्मू-काश्मीर प्रशासनाने कधी हुतात्मा सैनिकांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली आहे का ?

महाराष्ट्रात २७ जून या दिवशी कोरोनाच्या ५ सहस्र ३१८ नवीन रुग्णांची भर, १६७ जणांचा मृत्यू

२७ जून या दिवशी राज्यात कोरोनाचे ५ सहस्र ३१८ नवीन रुग्ण आढळले असून १६७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. २७ जून या दिवशी बरे झालेल्या ४ सहस्र ४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून राज्यात ६७ सहस्र ६०० रुग्णांवर उपचार चालू आहेत.

सांगलीत महापालिकेची शववाहिका मध्येच बंद पडल्याने ढकलत स्मशानभूमीत न्यावी लागली

अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी नेतांना महापालिकेची शववाहिका वाटेतच बंद पडल्याने मृताच्या नातेवाइकांना ती ढकलत घेऊन जावी लागली. २ दिवस शववाहिका वाटेतच बंद पडत आहे.

‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराची यशोगाथा !

‘कोरोना विषाणूमुळे देशात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून दळणवळण बंदी लागू करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण जीवनच ठप्प झाले. केवळ सर्व व्यवहार थांबले असे नाही, तर कोरोनामुळे भीतीचे वातावरण सर्वत्र पसरल्याचेे जाणवत होते….

‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव

गुरुपौर्णिमेच्या दिनी १ सहस्र पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ सर्वांना होण्यासाठी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करत आहोत.

गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक

ज्याप्रमाणे मुलाला बोलायला शिकवतांना प्रारंभाला लहान शब्द शिकवतात, चालायला शिकवतांना हळूहळू चालवतात, तसेच गुरुही शिष्याला टप्प्याटप्प्याने हळूहळू शिकवतात.                              

पाक २९ जूनला शीख भाविकांसाठी पुन्हा उघडणार करतारपूर साहिब महामार्ग

पाक २९ जूनला शीख भाविकांसाठी करतारपूर साहिब महामार्ग पुन्हा उघडणार आहे, अशी माहिती पाकचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी दिली.

नेपाळमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट सरकारकडून आता हिंदी भाषेवर बंदी घालण्याची सिद्धता

हिंदी भाषेच्या सूत्रावरून जनता समाजवादी पक्षाच्या खासदार आणि मधेशी नेत्या सरिता गिरी यांनी नेपाळ सरकारच्या या निर्णयास संसदेत विरोध दर्शवला. त्या म्हणाल्या की, ‘सरकार तराई आणि मधेशी क्षेत्रांत असंतोषाला आमंत्रण देत आहे. सरकारचा हा निर्णय चीनच्या तालावर घेण्यात आला आहे का ?’

सर्वोच्च न्यायालयाने धीरज आणि कपिल वाधवान यांचा जामीन अर्ज फेटाळला

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याने त्यांचा जामिनासाठीचा अर्ज निरर्थक ठरतो’, असे अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वाधवान बंधूंचा जामीनअर्ज फेटाळून लावला.