रत्नागिरीत आणखी ८ जणांना कोरोनाची लागण : कोरोनाबाधितांची संख्या ५१९

रत्नागिरीत सामूहिक संसर्गाला प्रारंभ झाल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांची माहिती

उज्ज्वलनगर (बेळगाव) जवळ कंटेनरमधून कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशियांची सुटका

गोवंशियांची वाढती तस्करी चिंताजनक आहे ! संपूर्ण देशात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करून त्याची कठोर कार्यवाही व्हावी, ही हिंदूंची मागणी आहे !

पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे धरण पूर्ण रिकामे

पाण्याचा योग्य वापर न केल्यास पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. हे टाळण्यासाठी पाण्याचा योग्य वापर करायला हवा !

पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याच्या संदर्भातील उपयुक्त माहिती

माहिती सेवा समिती आणि दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांच्या वतीने जनहितार्थ प्रसारित करण्यात आलेली अन् माहिती सेवा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतांनाचे नियमांविषयी संकलित केलेली माहिती वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

मास्कचा वापर न करणार्‍यांना ५०० रुपये दंड

मास्कविना फिरणार्‍या किंवा त्याचा वापर न करणार्‍या नागरिकांकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असा आदेश आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे.

१ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे नेते रत्नाकर पवार यांना अटक

भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करण्याचे आमीष दाखवून १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी नाशिक येथील भाजपचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक रत्नाकर पवार यांच्यासह दोघांना न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२५ जून या दिवशी महाराष्ट्रात कोरोनाबाधित १९२ नागरिकांच्या मृत्यूची नोंद

२५ जून या दिवशी राज्यात कोरोनाचे ४ सहस्र ८४१ नवीन रुग्ण सापडले असून १९२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. २५ जून या दिवशी बरे झालेल्या ३ सहस्र ६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

कोरोनाची चाचणी ३० मिनिटांत करणारी १ लक्ष ‘अँटीजेन टेस्टिंग कीट’ खरेदी करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आय्.सी.एम्.आर्.) या संस्थेने मान्यता दिलेल्या ‘एस्.डी. बायोसेन्सर’ या एकमेव आस्थापनाच्या ‘कीट’द्वारे ‘अँटीजेन टेस्टिंग’ करण्यास अनुमती देण्यात आली आहे.

मागील ४-५ दिवसांत चीनकडून ४० सहस्र ३०० सायबर आक्रमणे ! – यशस्वी यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर विभाग

मागील अनेक दिवसांपासून भारतीय पायाभूत सुविधा, अधिकोष सेवा आणि माहिती क्षेत्र यांच्या ‘सायबर स्पेस’मध्ये चीनकडून सायबर आक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. मागील ४-५ दिवसांत चीनकडून ४० सहस्र ३०० सायबर आक्रमणे करण्यात आली आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री  

सोयाबीन आणि कापूस या बोगस बियाण्यांची विक्री, तसेच पाऊस अल्प झाल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतामध्ये पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या ५४९ तक्रारी जिल्हा कृषी विभागाकडे आल्या आहेत.