गुहागर सेतू कार्यालय तात्काळ चालू करण्याची शिवसेनेची मागणी

अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? जनतेला योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने स्वत:हून हे करायला हवे !

खेड येथे अपघातात चारचाकीने ३ वाहनांना ठोकरले : दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरणे महामार्गावर एका चारचाकी वाहनाने २ दुचाकी आणि रुग्णवाहिका यांना धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून वाहनांचीही हानी झाली आहे.

कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेला १ जुलैपासून प्रारंभ

कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेला १ जुलैपासून प्रारंभ होत आहे. गेल्या ३ मासांपासून दळणवळण बंदीमुळे ही सेवा बंद होती.

हप्ते मागणार्‍या दोघा तोतया पोलिसांना नागरिकांनी चोपले

वडापाव विक्रेत्याकडे हप्ता मागणार्‍या तोतया पोलिसांना नागरिकांनी  चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शिवाजी पेठेत विद्यार्थी कामगार चौकात घडला. आदर्श अनिल भोसले आणि वैभव शहाजी कुरणे अशी संशयितांची नावे आहेत.

सुळकुड बंधार्‍यातून इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) पाणी देण्यास विरोध

इचलकरंजी शहरासाठी सुळकुडच्या दूधगंगा नदीपात्रातून पाणी उचलण्याला विरोध होत आहे. भविष्यात पाणीटंचाई जाणवेल या धास्तीने कागल तालुक्यातील ३९ आणि शिरोळ तालुक्यातील १२ गावांनी या योजनेला विरोध केला आहे. लाभ क्षेत्रातील जवळपास ५० गावे अस्वस्थ आहेत.

महावितरणकडून ग्राहकांना अडीच मासांचे एकत्रित वीजदेयक देण्यात येणार

दळणवळण बंदीच्या काळात बंद असलेल्या वीजदेयकांचे वाटप महावितरणकडून चालू करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या अडीच मासांतील वापरानुसार एकत्रित वीजदेयक देण्यात येत आहे.

फलटण (जिल्हा सातारा) येथे ४०० किलो गोमांस विक्रीसाठी नेणारे ३ धर्मांध पोलिसांच्या कह्यात 

कुरेशीनगर येथे वाहनामध्ये ४०० किलो गोमांस विक्रीसाठी नेत असतांना पोलिसांनी जप्त केले. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही त्याचे सर्रास उल्लंघन होते, हे किती दिवस चालणार ?

चिनी वस्तूंच्या विरोधात पुणे येथे निदर्शने

चीनने केलेल्या विश्‍वासघातकी आक्रमणामध्ये हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना २१ जून या दिवशी केडगाव चौफुला येथे श्रद्धांजली वहाण्यात आली. तसेच चिनी वस्तूंची मोठी होळी करण्यात आली.

कौंडण्यपूर (अमरावती) येथील माता रुक्मिणीच्या पालखीला पंढरीच्या वारीसाठी अनुमती !

विदर्भाची पंढरी आणि माता रुक्मिणीचे माहेर असलेल्या कौंडण्यपूर येथील आषाढीच्या वारीला या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनुमती मिळाली नव्हती.

रत्नागिरीत कोरोनाचा २४ वा बळी : एकूण कोरोनाबाधित ४९९

रत्नागिरी येथील जिल्हा ‘कोव्हिड’ रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २४ वर पोचली आहे.