५० जणांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात विवाहास सशर्त अनुमती ! – जिल्हाधिकारी

५० लोकांच्या मर्यादित उपस्थितीत विवाह करण्यास काही अटींसह अनुमती देण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

टॅब न मिळाल्याने बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्याची आत्महत्या

वडिलांनी टॅब (भ्रमणभाषप्रमाणे काम करणारे; पण आकाराने भ्रमणभाषहून थोडे मोठे असलेले एक उपकरण) घेऊन न दिल्याने भोजगाव या गावातील अभिषेक संत (वय १६ वर्षे) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

हुतात्मा सुनील काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचे दायित्व श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाने घेतले

जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र सैनिक सुनील काळे हुतात्मा झाले.

वर्ष २०१९ मध्ये सत्ता स्थापनेसाठी शरद पवार यांनीच अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव दिला होता ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

महाराष्ट्रात वर्ष २०१९ मध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव देऊन चर्चा केली होती.

आषाढी यात्रेसाठी सक्षम पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार !

यंदा आषाढी वारी कोरोनामुळे रहित करण्यात आली आहे. ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पंढरपूर येथे दीड सहस्रांहून अधिक पोलिसांचा पहारा ठेवण्यात येणार आहे.

पाणी पातळी वाढल्यावर स्थलांतराला विरोध करणार्‍या नागरिकांवर गुन्हे नोंद करण्यात येणार ! – नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली महापालिका

गतवर्षी ऑगस्टमध्ये महापुराच्या वेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थानांतर करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यंदा कृष्णा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर येताच पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित केले जाणार आहे.

मिरज येथील प्रसिद्ध आधुनिक वैद्य कोरोनाबाधित

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता येथील एक प्रसिद्ध आधुनिक वैद्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. २३ जून या दिवशी या आधुनिक वैद्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. २४ जून या दिवशी ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याच्या प्रकरणी धर्मादाय संस्थेला १० सहस्र रुपयांचा दंड

चिंचवड येथील एका धर्मादाय संस्थेने ‘आर्सेनिक आल्ब ३०’ या गोळ्यांच्या वाटपास स्थगिती द्यावी; म्हणून मानवाधिकार कायद्याच्या अंतर्गत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मिरज येथील ‘शिवगर्जना गणेशोत्सव मंडळ’ यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करणार

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर वर्ष २०२० मधील उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ‘शिवगर्जना’ या गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. उत्सवाच्या कालावधीत महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांना सहकार्य करण्याचा निर्णयही मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.

संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात येणार्‍या विविध अडचणींचे निराकरण व्हावे ! 

कोल्हापूर येथील शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी