शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना रुग्णालयात भरती करण्याची विविध पक्षांच्या खासदारांची मागणी

कोरेगाव भीमा हिंसेप्रकरणी अटकेत असलेले शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना कारागृहातून रुग्णालयात भरती करण्याची मागणी विविध पक्षांच्या १५ खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाविषयी कर्नाटकशी करार करावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

कर्नाटकला वेळेआधी अधिक विसर्ग करावा लागला, तर महाराष्ट्र त्याची भरपाईही करून देऊ शकतो. त्यामुळे पुराचा कोणताही धोका न पत्करता वरीलप्रमाणे किंवा शासन आणि विविध तज्ञांना योग्य वाटेल, ती योजना सिद्ध करावी. त्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी.

शिवसेनेच्या संतोष वाळके यांची माऊलींच्या वारीसाठी व्यय करण्याची सिद्धता  

कोरोनामुळे आषाढी वारी पायी सोहळा रहित झाला असून राज्यशासनाने हेलिकॉप्टर किंवा बस यांद्वारे संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पादुका पंढरपूर येथे नेण्याचा निर्णय घोषित केला आहे.

भाजयुमोच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात ३२४ जणांनी केले रक्तदान

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शिवस्मारक संकुल येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३२४ जणांचे रक्त संकलन झाले. प्रत्येक रक्तदात्यास रेनकोट भेट देऊन कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

उंचगाव येथे ४०० लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप

संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना मार्केट यार्ड येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सानुग्रह अनुदान दिले जाते.

शिधापत्रिकेवरील धान्य स्वत:च्या लाभासाठी वापरून शासनाची फसवणूक !

तालुक्यातील पाचेरी सडा येथील रेशन दुकानांत शिधापत्रिकेवर अल्प धान्य देऊन ‘ऑनलाईन’वर मात्र अधिक धान्य दाखवण्यात येऊन शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.

गुहागरमध्ये शिवसेना आणि युवासेना यांच्या वतीने चीनच्या विरोधात निदर्शने

भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या धुमश्‍चक्रीत २० भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. यासाठी चीनचा तीव्र निषेध गुहागर तालुक्यात करण्यात आला.

रत्नागिरीत कोरोनाचे आणखी २ बळी

२१ जून या दिवशी रत्नागिरीत कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ झाली आहे. मृत झालेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोविड रुग्णालयातील कापडगाव येथील एका पुरुष रुग्णाला (वय ५३ वर्षे) मधुमेहाचा आजार होता.

सूर्यग्रहणाच्या काळात श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती श्‍वेत वस्त्रांमध्ये ठेवण्यात आली

कंकणाकृती सूर्यग्रहणानिमित्त २१ जून या दिवशी श्री तुळजाभवानी देवीला परंपरेप्रमाणे सकाळी १०.८ पासून ते दुपारी १.३७ वाजेपर्यंत श्‍वेत वस्त्रांमध्ये (सोवळ्यात) ठेवण्यात आले होते.

८५ टक्के पालकांना मुलांच्या शिक्षणाची चिंता ! – सर्वेक्षण

कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा बंद असून मुलांचे शिक्षण थांबले आहे. यामुळे देशातील ८५ टक्क्यांहून अधिक पालक मुलांचे शिक्षण आणि त्यांचे भवितव्य यांमुळे चिंतेत आहेत, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.