रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणांवर पहारेकरी आणि चौकीदार यांची नियुक्ती !

वर्ष २०१९ मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण अतीवृष्टीमुळे फुटले होते. या दुर्घटनेत २३ नागरिकांचा बळी गेला होता. या सर्व धरणांवर पहारेकरी आणि चौकीदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय सैन्य चीनला पराभूत करू शकते, त्यामुळे राहुल गांधी यांनी नेतेगिरी करू नये ! – घायाळ सैनिकाच्या पित्याने राहुल गांधी यांना फटकारले

भारतीय सैन्य शक्तीशाली आहे. ते चीनला, तसेच अन्य देशांनाही पराभूत करू शकते. राहुल गांधी, तुम्ही नेतेगिरी करू नये. हे राजकारण चांगले नाही. माझा मुलगा पूर्वीही सैन्यात राहून लढला आणि पुन्हा लढेल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कराड (जिल्हा सातारा) येथील प्रसाद चौगुले राज्यात प्रथम 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १७ संवर्गातील ४३१ पदांसाठी १३ ते १५ जुलै, २०१९ या वर्षामध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित केला. यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात कराड (जिल्हा सातारा) येथील प्रसाद बसवेश्‍वर चौगुले यांनी ५८८ गुण प्राप्त करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

मुंबई महापालिका शाळेतील शिक्षकांना ३० जूनपर्यंत घरून कामाचे आदेश

मुंबई महापालिकेच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून चालू झाले असले, तरी ३० जूनपर्यंत शिक्षकांनी घरून काम करण्याचे (वर्क फ्रॉम होम) आदेश महापालिकेच्या शिक्षण अधिकार्‍यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे कारागृहात असलेल्या शहरी नक्षलवाद्यांची सुटका करण्याची देशातील ३७५ तथाकथित पुरो(अधो)गाम्यांची मागणी

शहरी नक्षलवादी म्हणून अटक करण्यात आलेले वरवारा राव, सुधा भारद्वाज, आनंद तेलतुम्बडे, गौतम नवलखा, वर्नोन गोंसाल्वेज, सुरेंद्र गडलिंग आदींची देशभरात कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सुटका करण्यात यावी, अशी मागणी ३७५ पुरोगाम्यांनी केंद्र सरकारकडे नुकतीच केली.

सांगली शहर भाजपच्या वतीने हुतात्मा भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात निदर्शने

चिनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर आक्रमण केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने चिनी राष्ट्राध्यक्ष आणि सैनिक यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

‘पास’चा कालावधी वाढवून न दिल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड !

मुंबईमध्ये १६ जूनपासून लोकलगाड्या चालू करण्यात आल्या आहेत; मात्र सेवा चालू करण्यापूर्वी आवश्यक गोष्टींचीही सिद्धता करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

इस्लापूर पोलीस ठाण्याच्या लाचखोर पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद

आरोपीच्या नातेवाइकांना गुन्ह्यात जामीन मिळून देण्यास साहाय्य करण्यासाठी येथील इस्लामपूर पोलीस ठाण्याचे साहाय्यक उपनिरीक्षक केशव जाधव यांनी २० सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

१९ जून या दिवशी महाराष्ट्रात कोरोनामुळे १४२ नागरिकांच्या मृत्यूची नोंद

१९ जून या दिवशी महाराष्ट्रात कोरोनाचे ३ सहस्र ८२७ नवीन रुग्ण आढळले असून १४२ नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या ५५ सहस्र ६५१ रुग्णांवर उपचार चालू आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी शुल्क न्यून करावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट  

कोरोनामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. काहींचे वेतनही कापले आहे. जी बचत करण्यात आली होती, ती दळणवळण बंदीच्या काळात वापरण्यात आली.