चीनने घुसखोरी केलेली नाही किंवा अतिक्रमणही केलेले नाही ! – पंतप्रधान

आपल्या भूमीमध्ये कुणीही घुसखोरी केलेली नाही किंवा आपल्या भूमीवर कुणीही एक इंचही अतिक्रमण केलेले नाही, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिली.

रत्नागिरीत चिनी वस्तूंच्या विरोधात मनसे आणि भाजप यांचे आंदोलन

भारत- चीन यांच्या सैनिकांमध्ये चालू असलेल्या धूमश्‍चक्रीत सीमेवर २० भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील तीनबत्ती नाका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसेच्या) वतीने निषेध करण्यात आला.

लांजा तालुक्यात २ ठिकाणी धाड टाकून सहस्रो रुपयांचा गुटखा आणि पानमसाला जप्त

लांजा येथे रियाज रशीद महालदार आणि तेलीवाडी येथील सुभद्रा किराणा दुकानावर धाड टाकून प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैधपणे साठवणूक केलेला सहस्रो रुपयांचा गुटखा, तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे.

नाशिक येथे ‘हॉर्न’ वाजवल्याच्या रागातून युवकाची हत्या !

भर रस्त्यात साहिल शेख हा धर्मांध त्याच्या मित्रांसह वाढदिवस साजरा करत असतांना गाडी जाण्यासाठी ‘हॉर्न’ वाजवला म्हणून वाढदिवस साजरा करणार्‍या टोळक्याने ‘हॉर्न’ वाजवणार्‍या युवकाची निर्घृण हत्या केली.

कोरोना रुग्णासह शहरातील रुग्णालयांच्या अद्यावत माहितीसाठी मुंबई महापालिकेचे अ‍ॅप

कोरोना रुग्णासह शहरातील रुग्णालयांच्या संदर्भात अद्यावत माहिती मिळावी, यासाठी मुंबई महापालिकेने ‘एअर वेन्टी’ हे ‘अ‍ॅप’ चालू केले आहे.

मिरजेत ९ किलो गांजा जप्त, २ धर्मांधांना अटक 

येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयासमोर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकून अनुमाने ९ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी अस्लम बाडवाले आणि युसूफ शेख यांना अटक करण्यात आली आहे, तर १ जण पसार झाला आहे.

परप्रांतीय कामगार मुंबई येथे पुन्हा परतू लागले

सर्व कामगारांची योग्य नोंदणी आणि ‘थर्मल चाचणी’ करण्यात येत असून त्यांचे घरीच अलगीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

निनाम पाडळी (सातारा) येथे शिकार करण्याच्या सिद्धतेत असणारी १२ जणांची टोळी कह्यात

निनाम पाडळी (जिल्हा सातारा) येथे १२ जणांची टोळी वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या सिद्धतेत आहे, अशी माहिती परळी वनमंडल अधिकारी योगेश गावित यांना मिळाली.

सातारा येथे जोरदारपावसातही भाजपच्या वतीने चीनच्याविरोधात निदर्शने 

येथील भाजपच्यावतीने शिवतीर्थावर निदर्शनेकरत ‘चिनी वस्तूंवर बहिष्कारआणि स्वदेशीचा अंगीकार’, अशीशपथ घेण्यात आली. विशेष म्हणजेजोरदार पाऊस चालू असतांनाही निदर्शने करण्यात आली.

प्रतिपंढरपूर अशी ओळख असणारी ‘नंदवाळ’ येथील आषाढी एकादशीची यात्रा रहित

तहसीलदार, पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, ग्रामसमिती आणि विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समिती यांच्या सर्वानुमते या वर्षीची यात्रा रहित झाल्याचे घोषित केले.