मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रुग्णालये पूर्ण क्षमतेने चालवली गेलीच पाहिजेत ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

लोकलची सेवा चालू झाल्यामुळे कर्मचार्‍यांच्या येण्याजाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या सीमेतील सर्व रुग्णालये पूर्ण क्षमतेने चालवली गेलीच पाहिजेत, अशी चेतावणी आरोग्यमंत्री राजेश टोपे दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्ष २०२१ मध्ये वस्त्रोद्योग मंदीमध्ये जाण्याची शक्यता

कोरोनामुळे वस्त्रोद्योजकांचा मुख्य हंगाम मंदीत गेला असून त्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. वस्त्रोद्योगास २०२१ हे वर्ष मंदीचे जाईल, अशीही शक्यता आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी ५ प्रॉडक्शन हाऊसच्या मालकांना समन्स

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍यांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांचा हात असल्याची चर्चा होत आहे. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी ५ प्रॉडक्शन हाऊसच्या मालकांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवले असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

लोकल चालू होऊनही अत्यावश्यक सेवांतील कर्मचार्‍यांची फरफट चालूच

येथे ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर क्षेत्रांतून प्रतिदिन कामानिमित्त ये-जा करणार्‍या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्‍यांच्या अधिक संख्येमुळे राज्यशासनाच्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयाने उपनगरीय रेल्वेसेवा चालू केली

वठणीवर येत नाही, तोपर्यंत चीनशी कोणतेही व्यवहार नको ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

भारतीय सैनिक हुतात्मा होत असतांना महाराष्ट्रात २ चिनी आस्थापनांशी करार होत होता. त्यांना भूमी दिली जात आहे. हे योग्य नाही. राज्यशासनाने चीनसमवेत केलेले करार त्वरित रहित करावेत.

विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे परीक्षेला येणे टाळले, तर त्यांना कोणत्या श्रेणीनुसार गुण देणार ? – मुंबई उच्च न्यायालय

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ‘जुलै २०२० मध्ये परीक्षा द्या किंवा यापूर्वी झालेल्या परीक्षेच्या आधारावर श्रेणी पद्धतीने गुण देण्यात येतील’, असे निश्‍चित केले आहे. त्यावर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अरविंद तिवारी यांनी न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

मला २ नातू असून त्यांनाही मी सैन्यात पाठवणार !

गलवान खोर्‍यात झालेल्या धुमश्‍चक्रीत बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील आरन गावातील कुंदन कुमार हे हुतात्मा झाले.

‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे अधिकृत संकेतस्थळ चालू  

राममंदिरासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडून त्याचे अधिकृत संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे. यामध्ये राममंदिराच्या बांधकामाविषयीची आतापर्यंची माहिती देण्यात आली आहे, तसेच पुढील होणार्‍या गोष्टी अंतर्भूत केल्या जाणार आहेत.

तेलंगाणामध्ये दळणवळण बंदीच्या काळात मुसलमानांवरच अधिक गुन्हे का ? – तेलंगाणा उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

देशातील दळणवळण बंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी सर्वाधिक गुन्हे मुसलमान समुदायातील नागरिकांवरच का नोंद झाले आहेत ? इतर समाजातील नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केले नाही का ?….

विद्युत् पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी उपाययोजना करा !

कार्यकारी अभियंता यांच्याकडे शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी