जळगाव येथील भाजपचे पदाधिकारी दिनकर पाटील यांची निर्घृण हत्या  

जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांची अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हत्या केली आहे. १६ जूनच्या मध्यरात्री २ ते २.३० च्या सुमारास ही घटना घडली.

सेवेत उपस्थित न रहाणार्‍या वैद्यकिय कर्मचार्‍यांवर मुंबई महानगरपालिका बडतर्फीची कारवाई करणार !

महानगरपालिका प्रशासनाने रुग्णालयामधील जे वैद्यकीय अधिकारी, तसेच कर्मचारी २३ मार्चपासून कर्तव्यावर उपस्थित राहिलेले नाहीत, अशा कर्मचार्‍यांना तातडीने उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले होते; मात्र तरीही काही कर्मचारी उपस्थित झाले नाहीत.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या चालकांवर कठोर कारवाई करा !

दळणवळण बंदी शिथिल केल्यानंतर जूनपासून अनेक वाहनचालक रस्त्यावर येत आहेत. बरेच वाहनचालक शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणे, वेगात वाहन चालविणे, ‘सिग्नल’ ओलांडणे आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत.

फलटण (जिल्हा सातारा) येथे वीजमंडळ अभियंत्यास लाच स्वीकारतांना पकडले 

फलटण जिल्हा सातारा येथील वीजमंडळ अभियंता नंदकुमार भानूदास काळे यांनी तक्रारदार यांना ११ नवीन मिटरचे कोटेशन देण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

कोल्हापूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या

मुलांवर लहान वयातच योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते सांगणारी घटना ! दोन अल्पवयीन मुलांनी एका ४ वर्षांच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून विहिरीत ढकलून तिची हत्या केली.

पसार आरोपी आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांना अटक

येथे कचर्‍याच्या ठेक्यातील अनामत रक्कम देण्यासाठी २ लाख ३० सहस्र रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह ३ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

खोट्या कागदपत्रांद्वारे बेळगाव येथे शाळेची विक्री केल्याप्रकरणी सात मासांनी गुन्हा नोंद 

येथील चव्हाट गल्ली परिसरातील शाळा विक्री केल्याच्या प्रकरणी ९ जणांविरुद्ध ७ मासांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्रमांक १ यांच्याकडे ९ जणांच्या विरोधात खासगी तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा व्यय

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग रोखणे, रुग्णांचे स्वॅब घेणे आणि चाचणी करणे, जंतुनाशक फवारणी करणे, कोविड केअर सेंटरसाठी विविध साहित्य खरेदी यांसाठी आतापर्यंत सुमारे ३५ कोटी रुपयांचा व्यय झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नांदेड येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणार्‍या युवकाला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

जिल्ह्यातील मुखेड या गावी एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना एप्रिल २०१८ या दिवशी घडली होती. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी संतोष उपाख्य बंटी घोगरे याच्याविरुद्ध ‘पोस्को’ कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता.

कोल्हापूर जिल्ह्यात २ दिवस पावसाची संततधार, १७ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात गेले २ दिवस पावसाची संततधार असून १७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.