नागपूर येथे पालकांकडून मनमानी शुल्क वसुली करणार्‍या ४ शाळांवर शिक्षण विभागाची कारवाई

शिक्षण विभागाचा आदेश धुडकावून मनमानीपणे शुल्क घेणार्‍या शाळा प्रशासनाला वेळीच खडसवायला हवे !

मिथेनॉल वापरून सॅनिटायझरची विक्री होत असल्याप्रकरणी दक्षता बाळगावी ! – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग

विदेशात सॅनिटायझरमध्ये मिथेनॉलचा वापर करून विक्री करणार्‍या गुन्हेगारांची आंतरराष्ट्रीय यंत्रणा कार्यरत आहे. याविषयी योग्य ती दक्षता बाळगावी, अशी चेतावणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) दिली आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळानंतर महावितरणचे युद्धपातळीवर काम

जिल्ह्यात आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे सर्वाधिक हानी गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांत झाली होती. या हानीमध्ये महावितरण आस्थापनालाही फटका बसला होता. या वादळात सहस्रो विद्युत खांब जमीनदोस्त झाले होते.

पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवा ! – शिवसेनेचे निवेदन  

कागल तालुक्यात शेतकरी शेतीच्या कामासाठी पाणंदच्या पायवाटेचा उपयोग करतात. या रस्त्यावर काही शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे शेतकर्‍यांना कामासाठी ये-जा करण्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाचे ऐतिहासिक निर्णयाचे आणि प्रभावी कामगिरीचे वर्ष ! – सुरेश हाळवणकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासनाने दुसर्‍या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे.

वैदिक ज्ञानाविषयीचा पश्‍चिमी दृष्टीकोन पालटण्याची आवश्यकता ! – मुकुल कानिटकर 

वेद हे अपौरुषेय आणि प्रमाणित आहेत. अपूर्ण आधुनिक विज्ञानाने जर वेदांचे काही सिद्धांत प्रमाणित केले, तर त्यामुळे वेद नाही, तर आधुनिक विज्ञान योग्य दिशेने चालले आहे, हे प्रमाणित होते. वैदिक ज्ञानाविषयीचा पश्‍चिमी दृष्टीकोन पालटून वेदांचे विज्ञान आणि अध्यात्म जगाला देण्याची आवश्यकता आहे.

केवळ दोनच आठवड्यांत सर्व रक्तपेढ्यांमध्ये पुरेसे रक्त संकलन ! – संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख  

शिवसेनेचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या आवाहनानुसार माझे रक्त माझ्या मातृभूमीसाठी ही मोहीम राज्यभर राबवण्यात आली. श्री. ठाकरे यांच्या आवाहनानंतर केवळ दोनच आठवड्यांत सर्व रक्तपेढ्यांमध्ये पुरेसे रक्त संकलन झाले आहे.

भ्रमणभाषवर खेळ खेळण्यावरून भावाशी झालेल्या वादातून १२ वर्षीय मुलीची आत्महत्या

जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सांगवडे या गावातील एका १२ वर्षीय मुलीने भम्रणभाषवर खेळ खेळण्यावरून भावाशी झालेल्या वादातून तुळईला गळफास लावून आत्महत्या केली.

मावळ (जिल्हा पुणे) येथे बजरंग दलाच्या वतीने आपत्तीग्रस्तांना साहाय्य

चक्रीवादळामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांची घरे, जनावरांचे गोठे यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. विश्‍व हिंदु परिषदेची शाखा असलेल्या बजरंग दलाने या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या बांधवांना साहाय्यकार्य केले.

रत्नागिरीत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७० टक्के

१५ जून या दिवशी दिवसभरात ४ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण ३०५ जण कोरोनापासून मुक्त झाले आहेत. ही संख्या आता ७० टक्के झाली आहे.