दादर (मुंबई) येथे पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

दादर शिंदेवाडी येथे १३ जून या दिवशी एका पोलीस कर्मचार्‍याने ४ मजली इमारतीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुशांत पवार (वय २९ वर्षे) असे या पोलिसाचे नाव आहे. याविषयी माहिती मिळताच अग्नीशमनदलाचे पथक घटनास्थळी आले.

डॉ. अरुण भस्मे यांना आरोग्य विज्ञान विद्यापिठाकडून जीवनगौरव पुरस्कार जाहीर

येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अरुण भस्मे यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाने होमिओपॅथी विद्याशाखेतून वर्ष २०२० या वर्षाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला.

२ मासांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंत घरावर कोसळली : घराची १ लाख ३० सहस्र रुपयांची हानी

तालुक्यातील गोळप येथील नीलेश शांताराम संते (गोळप, संते वाडी) यांच्या घराजवळ ग्रामपंचायतीने मार्च २०२० मध्ये संरक्षक भिंत बांधली होती. या भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने ही संरक्षक भिंत कोसळली आहे.

येत्या ४ दिवसांत कोकण आणि गोवा येथे सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता

येत्या ४ दिवसांत कोकण आणि गोव्यात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मोसमी पावसाने गोवा राज्य आणि नंदुरबार जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार प्रारंभ केला आहे.

नगर येथे शिवभोजन केंद्रासाठी बनावट अन्न व्यवसाय परवाना देणार्‍यासह तिघांवर गुन्हा नोंद 

येथे शिवभोजन केंद्र चालवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचा बनावट परवाना देऊन अनुमती घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरपट्टी विभागात ३ कोटी १४ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद

महापालिकेच्या घरपट्टी विभागात चुकीच्या संगणकीय नोंदी आणि करारपत्रे यांची अवैध कार्यवाही करून ३ कोटी १४ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दळणवळण बंदी असतांना लग्नाची वरात काढल्याप्रकरणी वरासह १० जणांना अटक

दळणवळण बंदी असतांना वाजतगाजत लग्नाची वरात काढल्याप्रकरणी पोलिसांनी वर सद्दाम शेख यांच्यासह १० जणांना अटक केली आहे. मालाड-मालवणी येथील अंबुजवाडीत १२ जूनला रात्री ८ वाजता सवाद्य वरात काढण्यात आली होती.

पुणे महापालिकेकडून अडीचपट चढ्या दराने सॅनिटायझरची खरेदी ?

आरोग्य विभागाने सवलतीच्या दरात खरेदी केली आहे, असा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे; पण प्रत्यक्षात एम्.आर्.पी. आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यांमध्ये अंतर आहे. बाजारात उत्तम प्रतीचा सॅनिटायझरचा ५ लिटरचा डबा ६०० ते ७०० रुपयांनाही उपलब्ध आहे.

दळणवळण बंदीमुळे आईची भेट होत नसल्याच्या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील युवतीने केली आत्महत्या

सामान्य गोष्टीसाठी नैराश्यात जाऊन स्वत:चे जीवन संपवणारी युवा पिढी राष्ट्र उभारणीच्या कार्यात कसे योगदान देऊ शकेल ? तरुण पिढीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणारी साधना शिकवणे हाच एकमेव उपाय आहे.

पीककर्जाअभावी हिंगोली येथील शेतकर्‍याकडून शेतात दगड पेरून निषेध व्यक्त

पाऊस आल्याने अल्पभूधारक शेतकर्‍यांना पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी तातडीने पीककर्जाची आवश्यकता आहे; परंतु राज्य सरकारकडून मिळालेले आदेश आणि अधिकोषांचे नियम यांमुळे पीक कर्ज देण्यात अधिकोष टाळाटाळ करत आहेत.