कोरोनाला रोखण्यासाठी आज देशभरात ‘जनता कर्फ्यू’

सध्या ज्या शहरात आहात, तेथेच थांबा आणि प्रवास टाळा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन : लोकहो, या संकटकाळात शासन काढत असलेल्या उपाययोजनांचे तंतोतंत पालन करणे, हे आपले राष्ट्रकर्तव्य होय ! या ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होऊन शासनाला सहकार्य करा !

‘जनता कर्फ्यू’चे पालन करून उत्तरदायी नागरिकाचे कर्तव्य पार पाडा !

राष्ट्रहितार्थ निर्णयाला सनातन प्रभातचेही समर्थन ! सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी भारत शासन, प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. त्यानिमित्ताने यंत्रणांकडून काही सूचनाही प्रसारित केल्या जात आहेत. अशा संकटसमयी त्याचे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रकर्तव्य आहे.

भारतात एका दिवसात ९४ जणांना कोरोनाची लागण

रुग्णांची संख्या ३१० झाली

कोरोनाचे संक्रमण तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजनांची गती वाढवणे आवश्यक ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाची साथ पसरू नये, यासाठी जनतेनेही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या आवाहनांना प्रतिसाद देत ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होऊन आदर्श नागरिकाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

जनहो, २२ मार्च या दिवशी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करून शासनाच्या जनहितकारी आवाहनाला प्रतिसाद द्या !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा ‘जनता कर्फ्यू’ला पाठिंबा
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा शासनाच्या लोककल्याणकारी उपक्रमांना नेहमीच पाठिंबा होता आणि यापुढेही राहील !

कोरोना विषाणू : वैद्यकीय माहिती, घ्यावयाची काळजी आणि अन्य विवेचन !

‘कोरोना’ ही एक विषाणूची प्रजाती आहे. सध्या जगात ज्याची साथ पसरली आहे, तो ‘कोरोना १९’ हा त्यापैकी एक प्रकार आहे. मुख्यत्वे याचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला होतो.

गोव्यात १४४ कलम लागू, जाहीर सभा, धार्मिक कार्यक्रम आणि लग्न समारंभ यांच्या आयोजनावर बंदी

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने राज्यभर १४४ कलम लागू केले आहे. गर्दी टाळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात ५ किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येणे, जाहीर सभा, धार्मिक कार्यक्रम आणि लग्न समारंभ यांवर बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाचे निमित्त करून नास्तिकतावाद्यांनी हिंदु धर्मावर केलेली द्वेषमूलक टीका आणि तिचा रोखठोक प्रतिवाद !

कोरोनाचे निमित्त करून काही नास्तिकतावाद्यांनी हिंदु धर्मावर द्वेषमूलक टीका करणारा संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित केला आहे. या संदेशाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे केलेला रोखठोक प्रतिवाद येथे देत आहोत

कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा ! – जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग

२१ मार्चला रात्री १२ वाजल्यापासून ते ३१ मार्चला रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व आस्थापने आणि दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत; मात्र सर्व बँका, पाणीपुरवठा विभाग, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्युत विभाग, औषधांची दुकाने, घरगुती गॅसपुरवठा करणारी आस्थापने, प्रसारमाध्यमे आदी अत्यावश्यक सेवा चालू रहाणार आहेत.